मुंबईः व उपनगरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात २१५. ८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०९.९ मिलीमटर तर, पश्चिम उपनगरांमध्ये ७६. ०३ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसाबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही वेग अधिक होता. मरीन लाइन्स परिसरात दर ताशी तब्बल १०१.४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता.

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील अमीर हाऊस चाळीत तळ मजल्यावरील दुपारी साडेतीनपासून पाणी शिरण्यास सुरूवात झाली. घरांमध्ये गुढघाभर पाणी शिरल्याने १५ रहिवाशांनी वरच्या मजल्यावर स्थलांतर केले आहे. वरच्या मजल्यावरील रहिवाशांनी जेवण व राहाण्याची व्यवस्था केली आहे. रहिवाशांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक आणि आजारी रूग्णदेखील आहेत.

वाचाः
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसांतही या चाळीत पाणी शिरले होते. चाळीसमोर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून चाळीत तळ मजल्यावर पाणी घुसण्याची समस्या निर्माण झाली आहे, अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली.

मुसळधार पावसामुळं सखल भागांत पाणी साचले होते. पाण्याचा तातडीने निचरा व्हावा यासाठी ६ पंपिग स्टेशन व २९९ ठिकाणी बसविण्यात आलेले तात्पुरते पाण्याचा उपसा करणारे संच सुसज्ज व कार्यतत्पर ठेवण्यात आले होते.

वाचाः

मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे तात्काळ हटविण्यात आली आहे. तर, अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांलगतच्या मनपा शाळांमध्ये महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली.

वाचाः

पालिकेकडून उपाययोजना

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड येथील अमीर हाऊस चाळीत तळ मजल्यावरील दुपारी साडेतीनपासून पाणी शिरण्यास सुरूवात झाली. घरांमध्ये गुढघाभर पाणी शिरल्याने १५ रहिवाशांनी वरच्या मजल्यावर स्थलांतर केले आहे. वरच्या मजल्यावरील रहिवाशांनी जेवण व राहाण्याची व्यवस्था केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here