यवतमाळ :शेतात काम करीत असलेल्या १८ वर्षीय सार्थक गावंडे या तरूणाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेला तब्बल दहा दिवसाचा कालावधी लोटला, मात्र साधा क्ल्यू देखील पोलसांना मिळाला नाही. ही घटना दिग्रस तालुक्यातील विठोलीत घडली होती.दिग्रस तालुक्यातील विठोली मारुती येथील १८ वर्षीय सार्थक गावंडे हा रविवार, २ एप्रिलला शेतात मका कापणी व जनावरांना चारा आणण्यासाठी गेला होता. मात्र बराच वेळ होवून देखील तो घरी आला नाही, म्हणून वडील दीपक गावंडे त्याला शोधण्यासाठी शेतात गेले असता, सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. यावेळी अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यावर धारधार शस्त्रांनी वार करून जीवानिशी संपविल्याचे समोर आले.

बारामतीत खळबळ! जमिनीच्या वादातून भावाने घेतला भावाचा बळी, नांगरणी पाहून येताना साधला डाव
या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा नोंद केले होता. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने त्या ठिकाणी धाव घेत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. या घटनेला आता दहा दिवसाचा कालावधी लोटला. मात्र अद्यापही साधा क्ल्यू देखील पोलिसांना मिळाला नाही. त्यामुळे मारेकऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी कुटुंबीयांसह गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आजरा तालुक्यात खळबळ; वडील,आई, मुलाला बांधले, तोंडही कपड्याने बांधले, २५ जणांनी घर लुटले
ही घटना दिग्रस तालुक्यातील विठोली शेतशिवारात रविवारी सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास घडली होती. या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी लावून धरली होती. ही हत्या घडविण्यात आल्याची चर्चा घटनेनंतर परिसरात ऐकू येत होती. या खुनात पाच ते सहा मारेकऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता देखील तेव्हा वर्तविण्यात आली होती.

पाचगणीत खळबळ; रुम नंबर ११०, हॉटेल अलमिनारमध्ये मुंबईच्या पर्यटकाची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here