कानपूर:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पोलीस आणि एसटीएफने संयुक्त कारवाई करत अनोख्या पद्धतीने दारू तस्करीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूसह तस्करांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या तस्करांनी दारु तस्करीसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. हे तस्कर टरबूजाच्या आत लपवून ही दारू बिहारला नेत होते. जेव्हा पोलिसांनी तपासलं तेव्हा हे पाहून तेही आश्चर्यचकित झाले.बिहारमध्ये एप्रिल २००६ पासून दारूबंदी कायदा लागू आहे. याअंतर्गत राज्यात दारू खरेदी आणि विक्री या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दारू तस्कर आणि माफिया वेगवेगळे मार्ग शोधतात.

हृदयद्रावक! एकाच खोलीत भाऊ-बहिणीने एकत्र आयुष्य संपवलं, पाहणारा प्रत्येकजण सुन्न, कारण…
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश एसटीएफ टीमने कानपूर पोलिसांसह अशा एका टोळीला अटक केली आहे, जी एका ट्रकमध्ये टरबूजाच्या आडून बिहारमध्ये दारुची तस्करी करत होते. गुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयित ट्रक थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा त्यांना आत टरबूज असल्याचे आढळून आले. पोलिसांना संशयाच्या जोरावर टरबूज बाजूला काढून पाहिलं तेव्हा त्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी पोलिसांनी दोन दारू तस्करांना अटक करून ट्रकमधून २५० दारूच्या पेट्या जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक बिहारचा रहिवासी आहे. तर दुसरा युपीमधील अलीगढचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

अवैध दारूचा साठा पकडला

कानपूरचे एडीसीपी (पश्चिम) लाखन सिंह यादव यांनी सांगितले की, कानपूर पोलिसांनी यूपी एसटीएफसह अवैध दारूचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेली दारू बिहारला नेली जात होती. दारू तस्कर टरबूजाच्या आड लपवून दारू नेत असल्याचं तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी चालकासह अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडे चौकशी करून दारु तस्करी करणाऱ्या टोळीची माहिती घेतली जात आहे. पोलीस मुख्य आरोपीला लवकरच अटक करतील.

IPS व्हायचंय, खोलीभर अधिकाऱ्यांची छायाचित्रं; पण एका टॅटूने घात केला, अन् तरुण जग सोडून गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here