पॅरिस:एक उल्का हरवलंय. ते आकाशातून पृथ्वीवर पडलं, पण ते कुठेही सापडत नाहीये. शास्त्रज्ञ या उल्कावर आपली नजर ठेवली होती. तरीही ते कुठे गायब झालं हे शास्त्रज्ञांना कळत नाहीये. त्यामुळे आता एका संग्रहालयाने ही उल्का शोधण्यासाठी बक्षिस जाहीर केलं आहे. त्यामुळे जी कोणी व्यक्ती ही हरवलेली उल्का शोधेल तिला २० लाख देण्याचं या संग्रहालयाने जाहीर केलं आहे.न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, संग्रहालयाने ही उल्का शोधण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. जी कोणी व्यक्ती ती हरवलेली उल्का शोधून काढेल, त्याला २५ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे २० लाख रुपये बक्षीस दिले जाईल. विशेष म्हणजे संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी उल्काशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्यावरुन लोकांना ती शोधण्यास सोपं जाईल. ही अनोखी ऑफर मायन मिनरल अँड जेम म्युझियमने दिली आहे. हे संग्रहालय फ्रान्सच्या बेथेल येथे आहे.

पृथ्वीसदृश्य ग्रहावरुन रेडिओ सिग्नल, एलियन्सचा मिस्ड कॉल तर नाही ना?
अचानक क्रॅश झाली उल्का

मिळालेल्या वृत्तानुसार, गेल्या शनिवारी एक छोटी उल्का तुटली होती. ती आगीच्या गोळ्याप्रमाणे आकाशात उडताना दिसली. पण नंतर ती अचानक कोसळली आणि तेव्हापासून त्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती मिळालेली नाही. ती उल्का कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. ही उल्का शेवटची कॅनडाच्या सीमेजवळ दिसली होती.

स्वप्न होतं गायक होण्याचं पण परिस्थितीमुळे बनला गोळेवाला; तरुणानं हार मानली नाही, महिन्याला भरघोस कमाई

ही उल्का १ किलोची असू शकते

संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांकडे या उल्काशी संबंधित व्हिडिओ आणि चित्रंही आहेत. जो कोणी ही उल्का शोधण्यास तयार असेल, त्याला हे व्हिडिओ आणि चित्रे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. यासोबतच ती उल्का कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, याचीही माहिती दिली जाईल.

ही उल्का जंगली भागात पडल्याची माहिती आहे. या उल्केचे वजन एक किलो किंवा त्याहून थोडे अधिक असू शकते, असे सांगितले जात आहे. नासा देखील या उल्काला शोधत आहेत. परंतू ती अद्याप कोणालाही सापडलेली नाही.

अंड अडकलं अन् जगातील सर्वात मोठ्या अजगराने जीव गमावला, लांबी ८ मीटर, वजन तब्बल…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here