मुंबईः महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान २ तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

दरम्यान,
व उपनगरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. शहर परिसरात २१५. ८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०९.९ मिलीमटर तर, पश्चिम उपनगरांमध्ये ७६. ०३ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसाबरोबर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याचाही वेग अधिक होता. मरीन लाइन्स परिसरात दर ताशी तब्बल १०१.४ किलोमीटर इतका वाऱ्यांचा कमाल वेग आज नोंदवण्यात आला होता.

विहार तलावाबाबत खास माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २८.९६ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे.

या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.

या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ६५.५ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.

हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here