वाचा:
करोनाच्या दैनिक तपासणीची संख्या वाढ झाल्याने रुग्णांचा अधिक आकडा पुढे येऊ लागला आहे. बुधवारी शहरात ९६३ आणि ग्रामीणमध्ये ७२१ तपासण्या करण्यात आल्या. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात ९० हजार ७२१ तपासण्या करण्यात आल्या. बाधित ६ हजार ७५२ रुग्णांपैकी २ हजार १०१ रुग्ण ग्रामीणमधील आहेत. बुधवारी १५ जणांना मृत्यू झाला असून यात भिवापूर येथील ५५ वर्षीय पुरूष, पारडी येथील ५५ वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ४२ वर्षीय महिला, सुभेदारनगर येथील ७८ वर्षीय पुरुष आदींचा समावेश आहे.
वाचा:
करोना बाधितांची संख्या वाढत असली तरी करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. बुधवारी ८३ जणांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत करोनातून बरे झालेल्यांची संख्या ३ हजार ९३३ झाली असून बरे होण्याची टक्केवारी ५८.२४ टक्के आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने पूर्वीच्या तुलनेत आता बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी काहीशी घसरल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आजच्या स्थितीला २ हजार ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
वाचा:
करोनाची स्थिती
दैनिक करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण : ३९६
दैनिक पॉझिटिव्ह : २६९
एकूण पॉझिटिव्ह : ६,७५२
बुधवारी बरे झालेले : ८३
एकूण बरे झालेले : ३९३३
आतापर्यंत मृत्यू : २०४
आतापर्यंत तपासण्या : ९०७२१
बुधवारी आलेले पॉझिटिव्ह
लक्ष्मीनगर झोन : १९
धरमपेठ : १२
हनुमाननगर : ४३
: ४३
नेहरूनगर : ३३
गांधीबाग : २५
सतरंजीपुरा : १८
लकडगंज : २४
आशीनगर : ३४
मंगळवारी : ४१
आरोग्य अधिकाऱ्याला करोना
नागपूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला करोना झाला. बुधवारी या अधिकाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. रविवारी ताप आल्याने त्यांनी स्वत:हून तपासणी करून घेतली होती. या अधिकाऱ्याला सध्या करोनाची कुठलीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.