वाचा:
मुसळधार पावसामुळे आणि इतर भागांत उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले व केंद्र सरकारकडून आवश्यकते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले. ही माहिती देणारे ट्विट पीएमओ इडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबईला सलग दोन दिवस पावसाने झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील, असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबई महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.
वाचा:
मुंबईत विक्रमी पाऊस
मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासांतील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिका क्षेत्रात आज वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचाही सर्वाधिक वेग नोंदविण्यात आला. मरीन लाईन्स परिसरात दरताशी तब्बल १०१.४ किलोमीटर एवढा वाऱ्यांचा कमाल वेग सायंकाळी ४.१५ च्या सुमारास नोंदविण्यात आला. मुंबई महापालिका क्षेत्रात जोरदार वाऱ्यांच्या तडाख्याने १४१ ठिकाणी झाडे उन्मळून पडली. ही झाडे महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे आणि आणि विभाग कार्यालयांच्या स्तरावर असणाऱ्या यंत्रसामग्रीरी द्वारे तात्काळ हटविण्यात आली आहेत. अतिवृष्टीमुळे मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी विविध रेल्वेस्थानकांवर अडकून पडले होते. यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था रेल्वे स्थानकांलगतच्या पालिका शाळांमध्ये करण्यात आली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.