पुणेःपुण्यातील मावळा येथील वाघेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. बऱ्याच कालावधीनंतर भाविकांना मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन करता येणार आहे. ऐतिहासिक संदर्भ आणि स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर पावना धरणात आहे. धरणात असल्याने पावसाळा आणि नंतरचे चार असं आठ महिने हे मंदिर पाण्याखाली असते. फक्त चार महिनेच भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते. हे मंदिर पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक येतात.पावना धरण १९६५मध्ये बांधण्यात आलं. तर, १९७१मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली. धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले. उन्हाळ्यात फक्त तीन ते चार महिनेच हे मंदिर पाण्याबाहेर असते. यंदा मार्चअखेर हे मंदिर पाण्याबाहेर आलं आहे. जवळपास ७०० ते ८०० वर्ष जुनं हे मंदिर आहे. हेमाडपंथी शैलीत असेलेल वाघेश्वर मंदिर पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र आहे.

ताप कोणताही असो निदान होणार अचूक; मुंबई महानगरपालिका रुग्णालयांत ‘या’ चाचण्या उपलब्ध
संधोशनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे बांधकाम ११ किंवा १२व्या शतकात झाले असावे. कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत. तसंच, मंदिरात काही शिलालेखही आढळले आहेत. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. आता या मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर, आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत.

राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मंदिराचा कळस ढासळला आहे. फक्त गाभारा सध्या सुस्थितीत आहे. या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही अवशेष शिल्लक आहेत. या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही थेट संबंध आहे, असं जाणकार म्हणतात. कोकण-सिंधुदुर्गची मोहिम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. तसंच, छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा व कठीणगड (तुंग) किल्यावर आले, की आवर्जुन येथे दर्शनाला येत असत, असंही सांगितले जाते. सध्या या मंदिराची पडझड झाली आहे. पुरातत्व विभागाने मंदिराचे संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.

साडे तीन लाख पुऱ्या, १ हजार किलो कांद्याची चटणी; हनुमान जन्मोत्सवानिमित्त पुणेकरांसाठी महाप्रसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here