राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात ऋतुराज गायकवाड दुखापतीतून थोडक्यात बचावला. संजू सॅमसनने डावातील पहिले षटक संदीप शर्माला दिले. तर सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे सलामीसाठी उतरले. ट्रेंट बोल्ट दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऋतुराज गायकवाड खेळण्यासाठी तयार झाला आणि अचानक पुन्हा मागे गेला. पण संदीप शर्माने तोपर्यंत चेंडू टाकला होता. हा चेंडू ऋतुराजच्या शरीराकडे होता.
चेन्नईच्या सलामीवीराने चेंडूपासून लॅब जाण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत चेंडू त्याच्याजवळ आला होता. कसाबसा त्याने तो चेंडू रोखला. यानंतर दोन्ही खेळाडू हसायला लागले. संदीपने येऊन फलंदाजाची विचारपूस केली. साइड स्क्रीनसमोर कोणीतरी आल्याने ऋतुराज क्रिझवरून बाजूला गेला होता. हे सर्व पाहून बेन स्टोक्सलाही हसू आवरता आले नाही.
अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं
संदीपनेच केलं बाद
ऋतुराज गायकवाड हा संदीप शर्माचा बळी ठरला. वेगवान गोलंदाजाने त्याच्या पुढच्याच षटकात त्याला बाद केले. ऋतुराजने तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू लेग साईडच्या खाली खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडूला बॅटची वरची धार लागली आणि तो हवेत गेला. यशस्वी जयस्वालने झेल घेत ऋतुराजला माघारी पाठवले. ऋतुराज १० चेंडूत केवळ ८ धावा करू शकला. चेपॉक मैदानावर CSK कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने पहिल्या डावात १७५ धावा केल्या आणि त्यांच्या गोलंदाजांना संघाच्या या धावा वाचवण्यात यशही आले. त्यांनी चेन्नईच्या घरच्या मैदानावर त्यांचा ३ धावांनी पराभव केला.