जालना: जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील सिल्लोड रोडवरील मालखेडा गावाजवळ काल दुपारी ऑईलने भरलेला कंटेनरआणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात भोकरदन तालुक्यातील सुरंगळी गावातील योगेश निरंजन गवळी (वय २६) या तरुण चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या अपघातात योगेश मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. पण दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे योगेशची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोणा या गावात सोयरीक जुळली होती. येत्या १५ तारखेला म्हणजे परवाच त्याच्या लग्नाची सुपारी फुटणार होती. मात्र, सुपारी फुटण्याअगोदरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कर्नाटकात रंगले नाराजीनाट्य; भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेकांचा बंडाचा झेंडा
योगेश गवळी हा वाहन चालक असून तो आपली पिकअप क्रमांक एम.एच. १२ एस.एक्स ६६१० मध्ये काल बुधवारी दुपारच्या सुमारास सिल्लोडकडून भोकरदनकडे येत असताना हा अपघात झाला. समोरून येणारे ऑईल कंटेनर क्रमांक एम.एच ०४ एफ.पी २४९६ आणि त्याच्या पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. कन्टेनर चालक हा घटनास्थळावरून फरार झाला. ही अपघात एवढा भीषण होता की, यात पिकअपच्या समोरच्या भागाचा चुराडा होऊन चालक योगेश स्टेअरिंगच्या खाली दाबला गेला होता.

या अपघातात त्याच्या पायाचा अक्षरश: तुकडा पडल्यामुळे आणि डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे तो अत्यवस्थ झाला. घटनास्थळावर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत त्याला बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने उपचार सुरू असताना योगेशचा मृत्यू झाला. योगेश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात दोन बहिणी असून येत्या १५ एप्रिलला त्याच्या लग्नाची सुपारी फुटणार होती. मात्र, दोन दिवसाअगोदरच त्याच्या अपघाती मृत्यूने संपुर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मुंबईतील पॅथॉलॉजी लॅबची घोडचूक, HIV पॉझिटिव्ह रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here