मुंबई :चेपॉक स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएल २०२३ च्या १७ व्या सामन्यातील दुसऱ्या डावात राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू आर अश्विन आणि चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे यांच्यात मैदानावरच झोंबाझोंबी झाली.राजस्थानने उभारलेल्या धावसंख्येचा चेन्नई पाठलाग करत असताना सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर, आर अश्विन हा बॉल टाकत असतानाच अचानक मध्यभागीच थांबला. रहाणेने अश्विनच्या या कृतीची दखल घेतली. अश्विनने पुढचा चेंडू टाकला, तेव्हा शेवटच्या क्षणी रहाणेने माघार घेतली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चाहत्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा जयजयकार केला. अश्विन हा स्थानिक खेळाडू असून तो २००८ ते २०१५ इतक्या मोठ्या कालावधीसाठी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता.

अश्विनने रहाणेला १९ चेंडूत ३१ धावांवर बाद केले. रहाणेची विकेट चेन्नईसाठी मोठा धक्का होता. कारण ऋतुराज गायकवाड झटपट बाद झाल्यानंतर रहाणे आणि डेकॉन कॉनवे यांनी संघाची बाजू सावरली होती. सलामीवीर ऋतुराज तिसऱ्याच षटकात १० चेंडूंत अवघ्या आठ धावा काढून बाद झाला.

ऋतुराज बाद झाल्यानंतर रहाणे आणि कॉनवे यांच्यावर जबाबदारी आली. रहाणे बाद होण्यापूर्वी या अनुभवी जोडगोळीने दुसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.
VIDEO: आधी चेंडू मारला आणि मग हसायला लागला, संदीप शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात वेगळाच खेळ
रहाणे बाद झाल्यानंतर अश्विनने शिवम दुबेचीही विकेट घेतली. डावखुरा फलंदाज शिवम दुबेला एलबीडब्ल्यू देण्यात आले. दुबे या निर्णयाला आव्हान न देता माघारी फिरला. मात्र बॉल स्टम्पला लागला नसल्याने दुबेने रिव्ह्यू घेतला असता, तर त्याची विकेट वाचली असती, असं रिप्लेमध्ये दिसून आलं. शिवम दुबे बाद झाल्यानंतर मोईन अली मैदानात उतरला.

मुंबईकर सूर्याचा धावांसाठी ‘धावा’, ‘दिल्लीचा गुरु’ पाँटिंगकडून टिप्स, मालक अंबानीही खुलले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here