महिलेने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सांगितलं की, ‘आमची एक मुलगी आहे. पण माझ्या नवऱ्याला शंका आहे की ती मुलगी त्याची नाही. त्यामुळे त्याने अविश्वासापोटी माझी पॅटर्निटी टेस्ट केली. माझ्या नवऱ्याला माझ्यावर अजिबात विश्वास नाही. तो नेहमी माझ्या चॅटिंग्स चेक करतो आणि माझ्यावर कसलेही आरोप लावतो. त्याने माझी पॅटर्निटी टेस्ट करताच निकाल निगेटिव्ह आला. मी माझ्या नवऱ्याला कधीही धोका दिला नाही’
महिलेने सोशल मीडियावर ही कहानी शेअर केल्यानंतर ती तुफान व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये महिलेने लिहलं की, ‘माझी नवऱ्याला वाटतं की मी खोटी आहे. त्यामुळे तो माझ्यापासून विभक्त होण्याचा विचारही करत होता. जेव्हा त्याने घटस्फोटाचा विषय काढला, त्या रात्री मी खूप रडले. मी त्याला कधीही धोका दिला नाही. मी त्याच्यावर खूप प्रेम करते. तो खूप सूंदर दिसतो आणि खूप प्रेमळ आहे’ असंही तिने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे.
महिला म्हणाली की, ‘दोघांची ओळख होण्याआधी ती एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण लग्नानंतर मी फक्त नवऱ्यावर प्रेम केलं. माझी मुलगी ही त्याचीच आहे. मी त्याला कधी धोका दिला नाही आणि देणारही नाही. माझी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आता त्याला तो त्या मुलीचा बाबा नसल्याची शंका आहे. त्यामुळे मी त्याला कसं समजावू हे कळत नाही. मी आता खूप घाबरले आहे.’ त्याच्या डोक्यातून संशयाचं भूत जात नसल्याचंही महिलेने या पोस्टमध्ये लिहलं आहे.