अदानींची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायजेजने त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने Coal Washery बिजनेसमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने या बिजनेससाठी सब्सिडिअरी कंपनी तयार केली आहे, ज्याचं नाव पेल्मा कोलियरीज (Pelma Collieries) असं ठेवण्यात आलं आहे.
देशातील दोन बड्या उद्योगपतींच्या ठाकरे-शिंदेंसोबत भेटीगाठी
अदानी एंटरप्राइजेजच्या कोल वाशरी बिजनेसचं संचालन प्लेमा कोलियरीज करेल. अदानींकडून याची माहिती देण्यात आली आहे. अदानी एंटरप्राइजेजने ७ एप्रिल रोजी त्यांनी प्लेमा कोलियरीज लिमिटेड (PCL) ही कंपनी स्थापन केल्याचं म्हटलं आहे. कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना त्यावेळी ही कंपनी सुरू करण्यात आली.
अदानींची कंपनी
अदानींच्या नव्या कंपनीचं नाव पेल्मा कोलियरीज आहे. अदानी एंटरप्रायजेजचा मालकी हक्क या कंपनीवर आहे. ७ एप्रिल २०२३ रोजी या कंपनीची स्थापना करण्यात आली. याची स्थापना १० लाख रुपयांच्या सुरुवाती अथॉराइज्ड शेअरसह तसंच ५ लाख रुपयांच्या पेड अप शेअरसह करण्यात आली. ही कंपनी कोल हँडलिंग सिस्टमअंतर्गत काम करेल. कंपनीचं काम कोल वॉशरीशी जोडलेलं आहे. कोल वॉशरीचा विकास, निर्मिती आणि संचालन करण्याची जबाबदारी याची असेल. कोल वॉशरी कोळशामुळे झालेली घाण साफ करण्याची प्रक्रिया आहे.
अदानींनी बदलली रणनिती
अदानी समूहावर अनेक आरोप करण्यात आल्यानंतर कंपनीकडून त्यावर अनेक गोष्टींची उत्तर देण्यात आली. हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानींच्या नेटवर्थ तसंच शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यावेळी अदानींनी गुंतवणुकदारांचा विश्वास परत मिळवण्यासाठी संपूर्ण कर्ज फेडणं या गोष्टीला प्राधान्य दिलं होतं. पण या संपूर्ण गोंधळात त्यांनी नवी कंपनी उभारली. अदानींनी हिंडेनबर्गच्या आरोपांनंतर त्यांच्या कंपनीच्या रणनितीमध्ये बदल केले. गुंतवणुकदारांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कंपन्यांना बळ देण्याचा निर्णय घेतला. अदानी समूहाने व्यवसायाच्या रणनितीमध्ये बदल केले आणि नवा व्यवसाय सुरू करण्याऐवजी आधीच सुरू असलेले व्यवसाय सांभाळण्याचं म्हटलं होतं. गुंतवणुकदारांचा विश्वास मिळवण्यासाठी अनेक पाऊलं उचलण्यात आली. याचा परिणामही आता दिसतो आहे. अदानींच्या शेअर्समध्ये आता तेजी पाहायला मिळते आहे.