आज आम्ही तुम्हाला अशा म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगत आहोत, ज्याने गेल्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना १०,००० रूपयाच्या SIP वर १० लाखांपेक्षा जास्त फंड किंवा रिटर्न दिला आहे. हा म्युच्युअल फंड म्हणजे क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन. गेल्या काही वर्षांपासून गुंतवणूकदार प्रचंड पैसा कमाईसाठी शेअर बाजाराकडे वळत आहे, पण जास्त जोखीम असल्याने मार्केट लोकांना घाबरवतही आहे. मात्र, शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवायचा असेल आणि जास्त जोखीम घ्यायची नसेल, तर यावर उपाय आहे. तुम्ही चांगल्या रेटिंगसह म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला नफा मुळेच तसेच धोकाही कमी असेल.
गुंतवणूकदारांना बंपर परतावा
अनेक आर्थिक तज्ञ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. वरील नमूद केलेल्या क्वांट स्मॉल कॅप फंडाने थेट योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षांत गुंतवणूकदारांना ६४.५% परतावा दिला असून या फंडातील फक्त १०,००० रुपयांची मासिक गुंतवणूक तीन वर्षांत सुमारे १०.९ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, या योजनेच्या नियमित प्लॅनने तीन वर्षांत ६२.१९ टक्के परतावा देत १०,००० रुपयाची मासिक SIP सुमारे १०.४ लाख इतकी वाढली आहे.
टॉप स्टॉक होल्डिंग्स
एप्रिल २०२३ च्या फंडाच्या फॅक्टशीटसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज, ITC, HDFC बँक, जिंदाल स्टेनलेस, RBL बँक, IRB इन्फ्रास्ट्रक्चर, पंजाब नॅशनल बँक, बिकाजी फूड्स इंटरनॅशनल, उषा मार्टिन आणि जस्ट डायल या स्मॉल कॅप फंडाकडील टॉप स्टॉक होल्डिंग्स आहेत. तर क्वांट स्मॉल कॅप प्लॅनने १५.३% भांडवल बँकांना दिले असून त्यानंतर पेट्रोलियम उत्पादने (६.५२%), फार्मास्युटिकल्स (५.८६%) आणि बांधकाम (५.७८%) आहेत.
युटीआय म्युच्युअल फंडचे खाजगीकरण थांबवा; खासदारांनी अधिवेशनात सवाल उपस्थित करा | विश्वास उटगी