पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे सोलापूर हावये रोड येथील पुलाजवळ शेतकरी सांडू गुलाब पटेल हे त्यांच्या शेत नं. ७१ मध्ये शेतात गेले होते. त्यावेळी त्यांना पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये मृतदेह असल्याचं आढळून आलं. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी एका खड्डात एक पांढऱ्या रंगाची गोणी आढळून आली. त्या गोणीमध्ये अंदाजे ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. रक्तबंबाळ अवस्थेत महिलेचा मृतदेह शेतात गोणीमध्ये ठेवण्यात आला होता. महिलेच्या उजव्या हातावर मंगला असं लिहिलेलं होतं. दोन्ही हातात हिरव्या रंगाचे आणि उजव्या हातात पांढरा रंगाच्या घागा असल्याचं आढळलं.
घरमालकासोबत बायकोचे अनैतिक संबंध, भाडेकरूने साथीदारासोबत काढला काटा
दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्या महिलेवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अद्याप महिलेची ओळख पटू शकलेली नाही. या महिलेचा मृतदेह घाटी नेण्यात आला. त्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करून पुढील कारवाई पोलीस करीत आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक खटाने, स. फौ. मदन नागरगोजे, पो.हे. विठ्ठल एडके करत आहेत.