म. टा. प्रतिनिधी, पुणे :हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन तीनच्या शिवाजीनगर मेट्रो स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतराला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी लेखी परवानगी दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गातील मोठा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गासाठीची ९९.७५ टक्के जागा ताब्यात मिळाली आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या माध्यमातून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम सुरू आहे. हा प्रकल्प खासगी विकासकाच्या माध्यमातून सार्वजनिक खासगी भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येत आहे. पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेडला हे काम ४० महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यानुसार या मार्गाचे बरेचसे काम देखील झाले आहे. या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० टक्के भूसंपादन करून देण्याची जबाबदारी सरकार व पीएमआरडीएची आहे.

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मुंबई ते ठाणे प्रवास आता सिग्नल फ्री, नवी मुंबईकरही ठाण्याला सुस्साट जाणार!

हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गावरील २३ क्रमांकाचे मेट्रो स्टेशन उभारण्यासाठी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातील ११५०.६६ चौरस मीटर जागा कायमस्वरूपी व १०१.४१ चौरस मीटर जागा पीएमआरडीएला हवी होती. ही जागा हस्तांतर करण्यासाठी गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून पीएमआरडीएकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने ही जागा हस्तांतरणाला बुधवारी लेखी परवानगी दिली आहे. त्यामुळे मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ९९.७५ टक्के जागा मिळाली आहे. अद्याप न मिळालेली जागा ही राजभवन विभागाची आहे. ती जागा देखील एप्रिल महिन्यातच हस्तांतर होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, मुंबई राजभवन कार्यालयामार्फत जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here