मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर राज्याचे पर्यावरण मंत्री यांच्यावरही आरोप करण्यात येत आहेत. विरोधकांच्या या आरोपाला महाराष्ट्र युथ काँग्रेसचे अध्यक्ष यांनी उत्तर दिलं आहे. आदित्यजी, चिंता करू नका. सुशांतप्रकरणाचा तपास करण्यास मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस हे शेंबडं पोरगंही सांगेल, असा टोला सत्यजित तांबे यांनी लगावला आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. आदित्यजी, चिंता करू नका. जनता हुशार आहे. मुंबई पोलीस सक्षम आहे की बिहार पोलीस? हे शेंबडं पोरगंही सांगू शकेल, असा टोला लगावतानाच आपण करत असलेले उत्तम कार्य सहन न होऊ शकणाऱ्यांचे हे गलिच्छ राजकारण आहे, अशी टीका तांबे यांनी केली आहे.

सुशांतसिंह प्रकरणात विरोधकांकडून आरोप होत होते. त्याकडे आदित्य ठाकरे यांनी दुर्लक्ष केले होते. मात्र, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट आरोप केल्याने आदित्य यांनी तात्काळ एक पत्रक काढून विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेत विरोधकांचे कानही उपटले होते. मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कोणतेही कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे’, असे खडेबोलही आदित्य यांनी सुनावले. सुशांत प्रकरणी कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, असे आवाहनही आदित्य यांनी केले. याप्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कुणी राहू नये, असा सूचक इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला होता.

सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत व महाराष्ट्राच्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here