मुंबई: सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आरोप झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पर्यावरण मंत्री यांनी वापरलेल्या एका वाक्यावरून भाजपनं आता त्यांना घेरलं आहे. ‘आदित्य ठाकरे यांच्या त्या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा,’ असा सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते, आमदार यांनी केला आहे.

सुशांतसिंह प्रकरणात आरोप झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले होते. ‘बॉलिवूडमधील अनेक कलाकार माझे मित्र आहेत व तो काही गुन्हा नाही. सुशांतसिंह प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. माझ्याविरुद्ध केवळ गलिच्छ राजकारण सुरू आहे. पण मी संयम बाळगलाय,’ असं ते म्हणाले होते. आदित्य यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं त्यांना लक्ष्य केलंय.

वाचा:

‘एका मंत्र्याने ‘मी आजही संयम ठेऊन आहे’ अशा प्रकारचे उद्गार काढणे याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? संयम सुटला तर काय करणार आहात हे सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळण्याची गरज आहे. आदित्य यांच्या एका सहकाऱ्यावर सामान्य नागरिकाला मारहाण केल्याचे आरोप झाले होते, तशा पद्धतीचे काही करणे अपेक्षित आहे काय? लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला तर याला जबाबदार कोण,’ अशी विचारणाही भातखळकर यांनी केली आहे.

‘मुंबई पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणतात. परंतु ५० दिवसांनंतर साधा एफआयआर दाखल केलेला नाही, त्या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास कसा करत आहेत याचेही कायदेशीर ज्ञान महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी द्यायला हवे. आदित्य ठाकरे हे पर्यावरण मंत्री आहेत. कुठल्याही फौजदारी प्रकरणाचा तपास गृहखात्याच्या अंतर्गत येतो, असे असताना या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत हे त्यांना कसे कळले? गेल्या काही दिवसांत ते मुंबईच्या पोलिस आयुक्तांना भेटले अशीही चर्चा आहे. या दरम्यान त्यांनी ही सखोल तपासाची माहिती आपणहून घेतली की पोलिस आयुक्तांनी त्यांना दिली याचाही त्यांनी खुलासा करावा. कुठल्याही फौजदारी प्रकरणाची माहिती आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपास अधिकारी कोणालाही देऊ शकत नाहीत असे असताना पोलिस सखोल तपास करत आहेत हे आदित्य ठाकरे यांना कसे कळले? याचा त्यांनी तातडीने खुलासा न केल्यास या संदर्भात योग्य ती कायदेशीर पावलं आपण उचलू,’ असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.

वाचा:

आदित्य ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेलं पत्रक

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here