मुंबई: झालेल्या एका ७४ वर्षीय व्यक्तिचे यकृत आणि फुफ्फुस दान करण्यात आल्याने दोन जणांचे जीव वाचले आहेत. या व्यक्तिच्या कुटुंबीयांनी अवयदानाच्या घेतलेल्या निर्णयामुळे दोन गरजूंना नवीन आयुष्य मिळाले आहे.

परळच्या ग्लोबल रुग्णालयात ही अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. रुग्णाला रुग्णालयात आणले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती. न्यूरो सर्जनच्या म्हणण्यानुसार, मेंदूत अंतर्गत रक्तत्राव होत होता. या रुग्णावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परंतु, उपचारादरम्यान २४ तासांच्या निरीक्षणानंतर त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाच्या कुटुंबीयांच्या परवानगीनुसार रुग्णाचे अवयवदान केलं. ३० जुलै रोजी हे अवयवदान करण्यात आले आहे. या अवयवदानात यकृत व फुफ्फुस दान करण्यात आले आहे, अशी माहिती ग्लोबल रूग्णालयातील क्रिटिकल केअर युनिटचे डॉ. प्रशांत बोराडे यांनी दिली.

या रुग्णाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा गंभीर आजार होता. गेल्या दोन वर्षांपासून ही व्यक्ती डायलिसीसवर होती. या रुग्णाचा ब्रेनस्टेमने मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर अवयवदान करण्यासाठी कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णाचे यकृत व फुफ्फुस चांगल्या अवस्थेत असल्याने ते दान करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं झेडटीसीसी सरचिटणीस डॉ. भरत शहा यांनी सांगितले.

माझ्या वडिलांना मूत्रपिंडाचा त्रास होता. ते डायलिसीसवर होते. त्यामुळे अवयवांच्या प्रतिक्षेत असलेल्या रुग्णांची स्थिती आम्ही समजू शकतो. माझ्या वडिलांच्या अवयवांमुळे एखाद्या गरजूला नव्याने आयुष्य मिळू शकते, या भावनेतून आम्ही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. माझे वडील नेहमीच दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून जाणारे होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या अवयवांमुळे इतरांचे जीव वाचतील, याचाच आम्हाला आनंद आहे, असं या मृत व्यक्तीची मुलगी दिशा हिने सांगितलं.

तर, एखाद्याच्या अवयवदानामुळे गरजूंना जीवदान मिळत आहे. याबाबत जनजागृती वाढण्यासाठी झेडटीसीसी खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. याशिवाय अवयवदानाच्या वाढत्या जागरूकतेमुळे अनेक कुटुंब पुढाकार घेऊन अवयवदान करण्यासाठी पुढे येऊ लागली आहे, त्याच कौतुक व्हायला पाहिजे, असं ग्लोबल रुग्णालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तलौलीकर यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here