नवी दिल्ली :चांदीने पुन्हा ‘भाव’ खाण्यास सुरुवात केली असून, बुधवारी प्रथमच धातूचा भाव प्रतिकिलोसाठी ७५,३६५ रुपयांच्या पातळीवर गेला. बाजार बंद होताना तो घसरून ७४,९४० रुपयांच्या पातळीवर स्थिरावला. तत्पूर्वी, ७ऑगस्ट २०२० रोजी चांदीची प्रतिकिलो किंमत ७५,०१३ रुपयांवर पोहोचली होती. याचा अर्थ चांदीच्या भावाने ९७७ दिवसांनंतर पुन्हा ७५ हजार रुपयांच्या पातळीला स्पर्श केला आहे.

चालू महिन्यात पाच एप्रिलला सोन्यानेही प्रति १० ग्रॅमसाठी ६०,७८१ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. चालू वर्षात चांदी प्रतिकिलोमागे ६,५९१ रुपयांनी आणि सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ५,४५० रुपयांनी वधारले आहे. चालू महिन्यातील दहा दिवसांत (तीन ते १२ एप्रिल) चांदी प्रतिकिलोमागे ३,२४० रुपयांनी आणि सोने प्रति दहा ग्रॅमसाठी ८९८ रुपयांनी वधारले आहे. ‘इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार, बुधवारी सोने ६०,६१३ रुपयांच्या पातळीवर स्थिरावले.

Gold Price Today: सोन्याचा भाव साठी पार, चांदीनेही उसळी घेतली; खरेदीसाठी मोजावे लागणार जास्त पैसे
कशी राहिली चांदीची वाटचाल?
सात ऑगस्ट २०२० ~ ७५,०१३

२५ सप्टेंबर २०२० ~ ५७,४७७

१ फेब्रुवारी २०२१ ~ ७३,०४३

३० सप्टेंबर २०२१ ~ ५८,११८

आठ मार्च २०२२ ~ ७०,८९०

एक सप्टेंबर २०२२ ~ ५२,०२२

दोन जानेवारी २०२३ ~ ६८,३४९

१२ एप्रिल २०२३ ~ ७४,९४०
कामाची बातमी! सोने खरेदी करताना दागिन्यांची शुद्धता कशी ओळखायची? जाणून घ्या
(स्रोत : आयबीजेए)

नव्वद हजारांपर्यंत जाण्याची शक्यता
केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते यंदा चांदीचा भाव प्रतिकिलोसाठी ९० हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणी वाढल्याने आणि सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने चांदीच्या किमतीत वाढ होत आहे. ‘सिल्व्हर ईटीएफ’मुळेही चांदीमध्ये गुंतवणूक वाढली आहे, त्याचाही परिणाम भाववाढीवर होत आहे.

मॉर्निंग वॉकसाठी दरवाजा उघडा ठेवला; त्याआधीच चोरांनी क्रार्यक्रम केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here