ठाणे:ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य नगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसोबत झालेल्या घरगुती भांडणातून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिलेच्या मानेला आणि पोटाला दुखापत झाली असून तिच्यावर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकमान्य पाडा नंबर ४ या परिसरात ११ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी सत्तार निसार गाजी (वय-४४) याचे त्याची पत्नी (वय-३४) हिच्यासोबत घरगुती भांडण झाले. या भांडणादरम्यान आरोपी सत्तार याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण अखेर एवढ्या विकोपाला गेले की, आरोपी पती सत्तार याने पत्नीवर भाजी कापण्याच्या चाकूने मानेवर आणि पोटावर वार केले.

Asad Encounter: परदेशी लॉ करायचं होतं, पण बापामुळे पासपोर्ट मिळाला नाही, बारावीच्या निकालापूर्वीच असदला कंठस्नान
या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून त्या महिलेला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी जखमी पीडित पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सत्तार याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा वर्तक नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीला तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. लोटे करीत आहेत.

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

सदिच्छा साने हत्याप्रकरण

मुंबई पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत असलेल्या सदिच्छा साने हत्याप्रकरणात काही नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. मुंबई गुन्हे शाखेने नुकतेच याप्रकरणातील आरोपी मिथ्थू सिंग आणि त्याचा मित्र जब्बार अन्सारी यांच्याविरोधात न्यायालयात १७९० पानांचे आरोपपत्र सादर केले होते. सदिच्छा साने ही २९ नोव्हेंबर २०२१ पासून गायब होती. मिथ्थू सिंग याने तिचा खून करून मृतदेह समुद्रात फेकून दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली होती. सदिच्छा साने ही जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. २९ नोव्हेंबरला तिची प्रिलिम परीक्षा होती. त्यासाठी सदिच्छा सकाळी घरातून बाहेर पडली होती. परंतु, परीक्षेला न जाता त्यादिवशी सदिच्छा साने बँडस्टँडला गेली होती. तेव्हापासून सदिच्छा साने गायब होती.

ट्रकमधून टरबूज नेत होते, थांबवून तपासलं तर आत भलतंच सापडलं; पोलिसांनी डोक्याला हात मारला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here