सांगली:भिलवडी येथे कृष्णा नदीमध्ये मगर आणि बैलाचा थरारक पाठलाग पाहायला मिळाला. चार तास नदीच्या पात्रामध्ये बैल आणि मगरींचा पाठलागाचा खेळ सुरू होता, अखेर जिगरबाज युवकांनी होडीतून जाऊन बैलाची मगरींच्या तावडीतून सुटका केली. पलुस तालुक्यातील भिलवडी या ठिकाणी साठेनगर मध्ये राहणाऱ्या अक्षय मोरे यांनी आटपाडीच्या बाजारातून ७० हजारांना रुपयांना एक खिलार जातीचा बैल खरेदी करून आणला. मात्र, बैल गावात आणल्यानंतर भलताच प्रकार घडला.अक्षयने हा खरेदी केलेला बैल एका टेम्पो मधून घेऊन गावात आला. गाडी गावात येताच गाडीतून बैल उतरवत असताना गाडीचा हॉर्न वाजला आणि बैल सैरभैरा धावू लागला. यानंतर बैलाने जवळच असणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात उडी घेतली.

संपूर्ण शहराला मगरमिठी! कित्येक किमी प्रवास करून मगरी नाल्यांमध्ये शिरल्या; नागरिक भयभीत

हा बैल नदीमध्ये उतरताच नदीच्या पात्रात आसपास असणाऱ्या मगरींचे लक्ष या बैलाकडे गेले.यानंतर अक्षय आणि आसपासच्या नागरिकांना धडकी भरली. मग या बैलाला नदीतून बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केला. मात्र भीतीने बैलाने नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूच्या पात्राकडे पाण्यातून प्रवास सुरू केला. तसा या बैलाच्या मागे तीन-चार मगरींनी त्याचा पाठलाग सुरू केला.

सांगलीत पुरानंतर मगरी पुन्हा नदी पात्राकडे परतल्या, पोहायला जाणाऱ्यांमध्ये धास्ती
मगरी जवळ जायच्या आणि बैल त्यांना चकवा देऊन पुढे जायचा असा खेळ तब्बल चार तास कृष्णा नदीच्या पात्रात सुरू होता. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला बैलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी आणि मगरीच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अक्षय व त्याच्या इतर मित्रांनी आणि धाडसी नावाडी चालकांनी प्रयत्न सुरू केले होते. बैल हा मगरींना घाबरून किनाऱ्याच्या बाजूला एका कोपऱ्याच जाऊन उभा राहिला. मगरींच्या भीतीने बैल जागेवरुन हलायला तयार नव्हता. अखेर मगरींच्या तावडीत बैल सापडण्याच्या आधी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बैलाला चुचकारुन कृष्णा नदीच्या दुसऱ्या बाजूने पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले आणि सगळ्यांनीच सुटकेचा श्वास सोडला. गावातील तरुण आणि नावाड्यांनी वेळीच धाडस करुन हालचाली केल्यामुळे या बैलाचा जीव थोडक्यात वाचला.

Sangli News : पुरानंतर आता मगरी पुन्हा नदीकडे वळू लागल्यानं सांगलीकरांमध्ये दहशत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here