चंद्रपूरःराज्यातील तापमानाचा पारा वाढला आहे. उकाड्याने सारेच नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भाततर उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरलं गेल आहे. शहर इतकी उष्णता का वाढली? याचे अनेक कारणे आहेत. गुरुवारी चंद्रपूरचे तापमानाची ४३.२ अंश सेल्सिअल्स इतकी नोंद झाली होती.जागतिक स्तरावर चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर गुरुवारी ठरलं. तर बुधवारला राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरात झाली होती. मंगळवार पासून तापामान वाढत चाललं आहे. एरवी दिवसभर धावत असणार शहर दुपारच्यावेळी ओस दिसू लागलं आहे. तापमानापासून बचाव करण्यासाठी शहरवासी विविध उपाय योजना आमलात आणताना दिसत आहेत. थंड पदार्थांची मागणी वाढली आहे. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यामुळं उन्हाचा चटक्यापासून तूर्तास शहरवासियांची सुटका नाही. आज पहाटेपासूनच उष्णता जाणवत आहे.

ऑनलाइन गेमचा नाद लय बेक्कार! जालन्याच्या तरुणाने ४० लाख गमावले, जमिनही विकावी लागली
चंद्रपूरचा पारा सलग तिसऱ्या दिवशी वाढला आहे. गुरुवारला ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. ११ एप्रिल रोजी चंद्रपूरचे तापमान ४१ अंश सेल्सिअस होते, तर १२ एप्रिल, बुधवारी ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुधवारचे तापमान राज्यात सर्वाधिक होते. गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी तापमानात मोठी वाढ झाली. गुरुवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले.

चंद्रपूरपाठोपाठ जगात सेनेगलच्या कोलडा येथील तापमान ४३ अंश सेल्सिअस तर भारतातील करनूल येथील तापमान ४२.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूरच्या तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

तापमान वाढीचे ही आहेत कारणे…

दरवर्षी चंद्रपूरचे तापमान का वाढतंय याला अनेक करणे आहेत. यातील प्रमुख कारण म्हणजे शहरातील प्रदूषण. शहराचं औद्योगीकरण झालं आहे. अनेक उद्योग येथे उभे झालेत. इथल्या तरुणांना रोजगार मिळाला हे खरे मात्र त्या सोबतच प्रदूषणामुळे इथल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणाच्या अतिशय गंभीर विषय असला तरी याकडे कुणी फारसं गंभीरतेने बघत नाही ही मोठी शोकांतिका.

काळजी घ्या! ४० दिवसांत महाराष्ट्रात उष्माघाताचे ३५७ रुग्ण, पुढील ३ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे
ही आहेत करणे….

विदर्भ हा मध्य भारतात येतो. बंगालची खाडी आणि अरबी समुद्रातील बाश्पी वारे विदर्भात पोहचत नाही. सोबतच इथं झालेली मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, प्रदूषण तापमान वाढीला कारणीभूत असल्याचं अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितलं.

अतिक अहमदने जेलमध्येच ठरवलं होतं मुलाचं लग्न, या कुटुंबातील मुलीशी ठरला होता असदचा निकाह

गावात नळ, विहीर, बोअरवेल पण गावकरी पाणी पिणार तर नाल्यातलंच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here