नवी मुंबई :कामोठे येथे पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाला बुधवारी सोलापूर येथील बाळूमामाच्या मंदिरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरप्पा श्रीरंग शेजाळ असे आरोपीचे नाव असून तो पापक्षालन किंवा देवाच्या क्षमा याचनेसाठी मंदिरात गेला होता. पोलिसांनी बिरप्पाच्या मुसक्या आवळल्या, तेव्हा तो मंदिरात नैवेद्याचं जेवण जेवत होता.मयत विवाहिता शीलवंता शेजाळ (३३) यांचा भाऊ नामदेव मेटकरी याने दिलेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई केली. बिरप्पा ज्या ठिकाणी लपून बसू शकतो, त्यापैकी सोलापूर येथील बाळूमामा मंदिर ही एक जागा असल्याचं मेटकरांनी पोलिसांना सांगितलं होतं.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्या पोलिसांच्या एका पथकाला बिरप्पा कामोठे रेल्वे स्थानकातून कुर्ला आणि नंतर कुर्ल्याहून सोलापूरला जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमध्ये चढताना आढळला होता. कामोठे रेल्वे स्थानकाच्या फुटेजमध्ये त्याच्याकडे पॉलिथिनची पिशवी दिसली असून त्यात खुनाचे हत्यार असल्याचा संशय आहे.

“आरोपीने सांगितलं की त्याने आपल्या पत्नीची हत्या हातोड्याने केली. नंतर शस्त्र वाशी खाडीत फेकून दिले. त्याच्या म्हणण्यानुसार, जोडप्यामध्ये पैशाच्या कारणावरून वारंवार भांडणे होत होती. घटनेच्या दिवशी तिने त्याची कॉलर पकडली होती. याचा राग आल्यामुळे पत्नीची हत्या केल्याचं त्याने कबूल केलं” असं गुन्हे शाखेच्या युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, मयत महिलेची मुलं सध्या आपल्याकडे राहत असल्याचं त्यांच्या भावाने सांगितलं. “मुलांच्या म्हणण्यानुसार, खुनाच्या दिवशी त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. शेवटी आरोपी म्हणाला होता की तुला मारल्यानंतरच माझ्या मनाला शांती मिळेल. त्यानंतर मुलांना शाळेत सोडण्यासाठी तो घराबाहेर पडला.” असंही भाऊ म्हणाला.

बायकोच्या खुनातून सोडवलं, पण उपकार विसरला; मेहुण्याचं कुटुंब संपवणारा म्हणतो मला फाशी द्या
“माझी बहीण पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याचा अर्थ त्याने तिला मारले तेव्हा ती कदाचित झोपली असेल. मुलांना सोडल्यानंतर तो तिला मारण्यासाठी परत गेला. ही हत्या रागाच्या भरात केलेली नाही, तर पूर्वनियोजित होती” असा दावाही महिलेच्या भावाने केला.

विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क पत्नीनेच करवून घेतला पतीचा खून

दक्षिण मुंबईतील राज्य नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयात लेखापाल म्हणून काम करणारा बिरप्पा आपल्या बहिणीचा लग्न झाल्यापासून छळ करत होता, असा आरोपही तिच्या भावाने केला. शीलवंता यांनी कोर्टात घरगुती हिंसाचाराचा खटलाही दाखल केला होता, मात्र फेब्रुवारीमध्ये झालेल्या लोकअदालतीत नातेवाईक आणि वकिलांसमोर बिरप्पाने माफी मागितल्यानंतर तिने खटला मागे घेतला होता.

भंडाऱ्यात त्रिकोणी कुटुंबाला संपवणारे सातजण जन्मभर तुरुंगात, चिमुरड्याच्या जन्मदिनीच न्याय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here