मुंबई:मुंबई पोलीस दलात हवालदार असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन बेस्ट बसेसच्या धडकेवेळी मधोमध सापडल्याने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाकोला परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. प्रवीण अशोक दिनकर असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नारायणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू मॉडर्न स्कूल जवळ, वाकोला मस्जिद या ठिकाणी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी हा अपघात घडला. प्रवीण अशोक दिनकर हे सांताक्रुझ येथील आपल्या घरातून मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी वाकोला परिसरात ३९२ क्रमांकाच्या बेस्टच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली.

भरधाव कार समोरुन आली,बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसाला धडक,सहकाऱ्यांनी सुरेश बांगर यांना रुग्णालयात नेलं पण…

प्रवीण अशोक दिनकर वाकोल्यातून जात असताना त्यांच्यापुढे असणाऱ्या बेस्टच्या बसमधून एक प्रवासी उतरत होता. त्यामुळे प्रवीण दिनकर हे बेस्ट बसच्या पाठिमागे थांबले होते. त्यावेळीच मागून बेस्टची दुसरी बस भरधाव वेगात आली. या बसचा ब्रेक लागला नाही. त्यामुळे ही बस पुढच्या बसवर जाऊन आदळली. त्यावेळी प्रवीण दिनकर हे दोन्ही बसेसच्या मधल्या भागात असल्याने ते चिरडले गेले. या अपघातात प्रवीण दिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना साधारण सव्वाअकराच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here