मुंबई :देशांतर्गत शेअर बाजारातून तुम्ही जोरदार कमाईची संधी शोधात असाल तर तुम्ही आता टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करू शकता. अलीकडच्या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी येत आहे. काही काळापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने प्रारंभिक सार्वजनिक ऑफर म्हणजे IPO लाँच करण्यासाठी कागदपत्रे दाखल केली होती आणि त्याचा पब्लिक इश्यू येत्या दोन ते तीन महिन्यांत बाजारात येईल, असे अपेक्षित आहे. त्याचवेळी टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमुळे टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये तेजी दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे, गुंतवणूकदारांसाठी ती चांगली परतावा देणारी गुंतवणूक ठरू शकते.टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडने सामान्य लोकांसाठी IPO लॉन्च करण्यासाठी कागदपत्रे दाखल केल्यापासून, मार्केट टाटा मोटर्सवर टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओच्या प्रभावाचे मूल्यांकन करत आहे. आगामी IPO मध्ये टाटा मोटर्सला टाटा टेक्नॉलिजीजचे ८,११,३३,७०६ शेअर्स विकायचे आहेत. दरम्यान, आईपोच्या ड्राफ्ट रेड हिअरिंग पेपर्स (DRHP) नुसार टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स ७.४० रुपये प्रति शेअरने विकत घेतले होते.

टाटाचा IT शेअर तुम्हाला बनवेल धनवान, कमाईची संधी सोडू नका! खरेदीआधी डिटेल्स वाचा
टाटा मोटर्स आणि टाटा टेक IPO वर एक्स्पर्ट बुलिश
देशांतर्गत मार्केट एक्स्पर्ट टाटा मोटर्स आणि टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO वर बुलिश आहेत. पुढील २-३ महिन्यांत बाजाराला पब्लिक इश्यूची अपेक्षा आहे, असे त्यांचे म्हणणे असले तरी अजूनही टाटा टेक्नॉलॉजीजच्या IPO ची किंमत (प्राइस) बँड अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु टाटा मोटर्सने टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स ७.४० रुपये प्रति शेअर दराने खरेदी केल्यामुळे टाटा मोटर्सला मोठा नफा होण्याचे बाजाराला अपेक्षित आहे.

अशा स्थितीत मार्केट तज्ञांनी टाटा टेक्नॉलॉजीजचे IPO शेअर्स खरेदी करू इच्छिणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांना टाटा मोटर्सचे शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात करण्याचा सल्ला दिला कारण नजीकच्या काळात ऑटो स्टॉकमध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांना सोन्याचे दिवस! दिग्गज IT कंपनीने उघडली तिजोरी, पाहा कसा होईल फायदा
टाटा टेक्नॉलॉजीज IPOचा फायदा टाटा मोटर्सला कसा
टाटा टेकच्या आयपीओची किंमत अजूनही निश्चित करण्यात आलेली नाही, पण टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओची किंमत टाटा मोटर्सने ज्या दराने कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्या दराच्या किमान ४-५ पट राहील, असे निश्चित आहे. अशा स्थितीत टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओचा टाटा मोटर्सला खूप फायदा होणार आहे.

संबंध तोडले, रशियाला दुखावलं; टाटांचा पुतिन यांना धक्का देणारा निर्णय

(टीप: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here