बुंदी : राजस्थानच्या बुंदी जिल्हात काही दरोडेखोरांनी शुक्रवारी बँक ऑफ बडोदाचं अख्खच्या अख्खं एटीएमचं उचलून नेलं आहे. या एटीएममध्ये तब्बल १३.५० लाख रुपये होते. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. येथील पोलीस एटीएम चोरी करणाऱ्या दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

बुंदी पोलीस अधिक्षक जय यादव यांनी सांगितलं, की पोलिसांनी एकाला डिटेन केलं आहे. तसंच एटीएम मशीन चोरी करताना वापरण्यात आलेलं वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. पुढील कारवाई सुरू आहे. अद्याप चोरी झालेली १३.५० लाखांची रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. एटीएम चोरीची घटना रात्रीच्या अंधारात घडली. पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅनमधून दरोडेखोर आले असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसतं. तसंच चोरट्यांनी काळ्या रंगाच्या कपड्यात चेहरा झाकून ही एटीएम लूट केली.

चालकानं रात्रभर बस चालवली सकाळी त्रास सुरु,प्रवाशांना सुखरुप पोहोचवलं, गाडी डेपोत येताच जागीच कोसळला अन्…
बँक ऑफ बडोदाने एक महिना आधीच हे एटीएम लावलं होतं. दरोडेखोरांनी एका मारुती व्हॅनच्या मदतीने ते एटीएम उचलून नेलं. दरोडेखोर मारुती व्हॅन लाखेरी कस्बे येथे असलेल्या बँक ऑफ बडोदाजवळ असलेल्या एटीएमजवळ पोहोचले. या एटीएममध्ये जवळपास १३ लाख ५०० रुपये होते. हे पैशांनी भरलेलं एटीएम मारुती व्हॅनमध्ये टाकून दरोडेखोरांनी पोबारा केला.

मुंबई महापालिकेतून ७ हजार चमचे, २०० लंच प्लेट आणि ग्लास गायब! कुणी नेली भांडी? एकच चर्चा रंगली
या संपूर्ण घटनेचा तपास बुंदी पोलीस अधिक्षक जय यादव करत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तयार केल्या आहेत, ज्या इतर दरोडेखोरांचा तपास करत आहेत. तसंच ज्या एका दरोडेखोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे, त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. अख्खंच्या अख्ख एटीएम उचलून नेताना मारुती व्हॅनचा वापर करण्यात आला. या चोरट्यांपैकी एकाची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here