Authored byनिलेश झाडे|Edited byकुणाल गवाणकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 14 Apr 2023, 7:31 pm

चंद्रपुरातील दोघांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. वरोरा शहरातून चंद्रपूरला जात असताना दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांची दुचाकी बॅरिकेडला धडकली.

 

road accident
चंद्रपूर: स्पोर्ट्स बाईकवरील नियंत्रण सुटल्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सुसाट वेगात सुटलेली बाईक वाहतूक शाखेने लावलेल्या बॅरिकेडला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अंकुश सुनील भडगरे आणि हर्ष सुरेश पाचभाई अशी मृतांची नावे आहेत. ही घटना भद्रावती शहराजवळील मानोरा फाट्याजवळ आज दुपारच्या सुमारास घडली.जिल्ह्यातील वरोरा शहराचे रहिवासी असलेले अंकुश व हर्ष वरोरा येथून स्पोर्ट्स बाईकने चंद्रपूरच्या दिशेने निघाले होते. भद्रावती शहराजवळ पोहोचताच मानोरा फाटा येथे रस्त्याच्या कडेला पोलीस विभागाने बॅरिकेड लावले होते. या बॅरिकेडला भरधाव वेगात असलेल्या बाईकने धडक दीली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही तरूणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंकुश आणि हर्ष बीएमडब्ल्यू जी ३१० आरआर बाईकवरून प्रवास करत होते. या बाईकची किंमत ३ लाख रुपयांच्या घरात आहे.
तलावात सापडलं पांढरं शिवलिंग; सात जणांनी घरी नेलं, परत आणून ठेवलं; पुजाऱ्यानंही हात झटकले
भरधाव वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मागील दोन महिन्यांत जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे हे अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here