बारामती :बारामतीत एका युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. चाकूचा धाक दाखवत या युवकाला गाडीतून नेले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ राजेंद्र गायकवाड ( वय २९, माळेगाव कारखाना ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. ज्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे,त्यांमध्ये रविराज लक्ष्मण तावरे, चेतन शिवाजी गीरीगोसावी व मनोज मोहन सस्ते (सर्व राहणार- माळेगाव अजिंक्यनगर, तालुका- बारामती) यांचा समावेश आहे.दि. १२ एप्रिल रोजी सकाळी राजहंस चौक ते खडी क्रेशर माळेगाव येथे घडली. गुन्ह्यामध्ये चाकू, दगड याचा वापर करण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, आरोपीनी माळेगाव कॉलेजकडे जावू असे सांगत फिर्यादीला गाडीत बसवून नेले.

पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना; मुलाच्या आजारपणाला कंटाळला, बापाने केले धक्कादायक कृत्य
चाकूचा धाक दाखवून रविराज लक्ष्मण तावरे याने फिर्यादीला तू माझा भाऊ रणजित तावरे यास मी गाडीवरुन मुली फिरवतो, दारु पितो असे का सांगितले. तुझ्याकडे बघूनच घेतो, चला रे गाडी खडी क्रेशरच्या बाजूने घेऊन चला, असे म्हणून गाडी खडी क्रेशरजवळ आल्यानंतर फिर्यादी गाडीतून खाली उतरवले.

नागपूर हादरले! १२ वर्षीय मुलीच्या पोटात दुखू लागले, आईने डॉक्टरांकडे नेले, तपासणी करताच बसला धक्का
रविराज तावरे याने हाताने माझ्या तोंडावर चापटी मारल्या. इतर दोघांनी शिवीगाळ करुन तेथे पडलेला दगड फिर्यादीच्या उजव्या पायाच्या नडगीवर जोराने मारुन दुखापत केली, अशी पीडित युवकाची तक्रार आहे.
राजापूर हातिवले येथील टोल नाका एका दिवसात बंद; पालकमंत्री उदय सामंतांचा महत्त्वपूर्ण निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here