नवी दिल्ली: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिराचे भूमिपूजन झाले. अनेक वर्षापासून ज्या क्षणाची रामभक्त वाट पाहत होते तो क्षण सर्वांनी अनुभवला. मोदी यांनी भूमिपूजनाचा दिवस ऐतिहासिकच नव्हे तर न भूतो ना भविषति असा केला. फक्त भारतातच नव्हे तर जगभरातील रामभक्तांना झालेला आनंद माध्यमांच्या माध्यमातून आणि सोशल मीडियातून दिसून येत होता.

वाचा-
राम मंदिराच्या या भूमिपूजनावर भारताचा शेजार असलेल्या पाकिस्तानमध्ये कोणाला आनंद झाला तर नक्कीच अश्चर्य वाटू शकेल. पण पाकिस्तानमधील एका क्रिकेटपटूने राम मंदिराच्या भूमिपूजनावर आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद त्याने रामाचा फोटो शेअर करत सोशल मीडियावरून व्यक्त केला.

आज जसे अयोध्यामध्ये राम मंदिराचे भूमिपूजन झाले. संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण झाले. हा आनंद फक्त भारतापूरता मर्यादीत नाही तर विदेशात देखील लोक आनंद व्यक्त करत आहेत. पाकिस्तानमध्ये देखील काही लोक यामुळे आनंदी झाले आहेत, अशी पोस्ट पाकिस्तानचा क्रिकेटपटू यांना केली आहे.

वाचा-
संपूर्ण जगभरातील हिंदू लोकांसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. श्री राम आपले आदर्श आहेत. दानिश कनेरियाने न्यूयॉर्कच्या टाइम्स स्केअरच्या बिलबोर्डवर राम मंदिराचा फोटो ट्विट केला होता. पण नंतर तो फोटो त्याने डिलीट केला आणि रामाच्या नव्या फोटोसह आनंद व्यक्त करणारा मेसेज लिहला.

गीता फोगाटच्या फोटोवरून सुरु झाला वाद
भूमिपूजनानंतर गीता फोगाटने रा मंदिराबाबत एक ट्विट केले होते. यात जय, जय राम… ऐतिहासिक दिवस! असे म्हटले होते. कोणीही असा संदेश लिहीणे चुकीचे नाही. पण या ट्विटबरोबर गीताने जो काही फोटो वापरला त्यावरून चांगलाच गदारोळ झाला.

वाचा-
गीताने ट्विट करताना एक फोटो वापरला आहे. या फोटोमध्ये दिसत आहे. या राम मंदिराकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रभू रामचंद्र यांना घेऊन जात असल्याचे दाखवले आहे. पण यावेळी प्रभू रामचंद्र यांचे लहान रुप दाखवले आहे आणि ते मोदी यांचा हात पकडून राम मंदिरात जात असल्याचे दाखवले गेले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here