Rahul Gandhi Will Meets Uddhav Thackrey : मातोश्रीवर राहुल भेट घेणार असल्याचे समजते. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकं आता दोघांत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Uddhav Thackeray-Rahul Gandhi..
‘मातोश्री’वर होणार राहुल-उद्धव ग्रेट भेट? नेमकी काय होणार चर्चा?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी येत्या काही दिवसांत मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समजते. स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र आदी विविध मुद्द्यांवर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात नुकतीच एक बैठक पार पाडली. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्यास सुरुवात झाली असल्याचे नंतर शरद पवार यांनी सांगितले. दिल्लीत ही घडामोड घडल्यानंतर आता राहुल गांधी ‘मातोश्री’वर जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत. विशेषतः उद्धव ठाकरे यांचा पक्ष नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नव्या भेटीगाठी…नवी चर्चा! अजित पवारांनी घेतली शिंदे-फडणवीसांची भेट, तर्कवितर्कांना उधाण
जे चौकशी करणार, राऊतांकडून त्यांच्याच कार्यक्रमाची तयारी; राष्ट्रवादीची मजबूत साथ, तारीख ठरली
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या भेटीच्या निमित्ताने ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही बोलले जात आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here