मुंबई: मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने पेडररोडवर केम्स कॉर्नर येथे भिंत खचून ४० ते ५० झाडे उन्मळून पडली आहेत. पेडर रोडवरील उड्डाण पुलावरही वृक्ष उन्मळून पडल्याने उड्डाण पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच रस्ते वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. आजही पावसाची संततधार सुरू असल्याने पेडररोडवरील हँगिग गार्डनजवळील भिंत खचली. त्यामुळे ४० ते ५० वृक्ष उन्मळून पडली. ही झाडे उड्डाण पूल आणि रस्त्याच्या मध्येच पडली. शिवाय भिंतीच्या मातीचा ढिगाराही रस्त्यावर आल्याने या परिसरातील वाहतूक ठप्प झाली. काही काळ या परिसरात वाहतूक कोंडीही झाली. मात्र ही वाहतूक आता दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येत आहे. तसेच अग्निशन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही झाडे आणि मातीचा ढिगारा काढण्याचं काम सुरू केलं आहे. वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती मिळताच पालिका आयुक्त यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना लवकरात लवकर हा रस्ता आणि उड्डाण पूल मोकळा करण्याचे आदेश दिले.

या परिसरात किमान ४० ते ५० वृक्ष उन्मळून पडले आहेत. हँगिग गार्डनच्या खालीच पिण्याच्या पाण्याची पाइप लाइन असल्याने त्याला तडे गेले आहेत. या पाइपलाइनचेही काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास २४ तास लागण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत पेडररोडवरील रहिवाश्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ५० टँकर पुरवले जाणार आहेत, असं चहल यांनी सांगितलं. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

मुंबईत काल ताशी १०१ किलोमीटरच्या वेगाने वारे वाहत होते. हे एक प्रकारचं वादळच होतं. पण संपूर्ण मुंबईत हे वादळ नव्हतं. दक्षिण मुंबईतच त्याचा प्रभाव होता. वादळ दोन प्रकारचे असतात कालचे वादळ हे त्यापैकी एक होते, असं चहल म्हणाले. काल कुलाबा ते नरिमन पॉइंट परिसरात विक्रमी पाऊस झाला. मुंबईत चार तासांत ३०० मिमी पाऊस पडला. मी ३० वर्षांपासून मुंबईत आहे. पण असा पाऊस कधीच पाहिला नाही. २६ जुलैलाही मी मुंबईत होतो. पण त्यावेळीही असा पाऊस कधीच पाहिला नव्हता, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी चहल यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली. साधारणपणे ६५ मिमी पाऊस पडला तरी अतिवृष्टी झाली असं मानलं जातं. इथं तर ३०० मिमी पाऊस पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यावर मुंबईच काय जगातली कोणतंही शहर तुंबणारच, असं सांगतानाच साधारण पाऊस पडून पाणी तुंबले असते तर मेट्रोच्या कामांमुळे मुंबई तुंबल्याचं आपण बोलू शकलो असतो. पण विक्रमी पाऊस पडल्याने मेट्रोवर खापर फोडता येणार नाही, असं सांगत त्यांनी मेट्रोला क्लिनचिट दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here