पुणे:देशभरात गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि उत्तर प्रदेशमधील कुख्यात गँगस्टर अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार यांचा गुरुवारी (१३ एप्रिल) एन्काउंटर झाला. तत्पूर्वी, ते पुणे मुक्कामी होते, अशी माहिती समोर आली आहे. असदचा पुण्याशी असलेला संबंध उघडकीस आल्याने पोलिस तपास करीत आहेत.बहुजन समाज पक्षाचे आमदार राजू पाल यांच्या हत्याप्रकरणातील साक्षीदार उमेश पाल याची आणि त्याच्या संरक्षणासाठी तैनात दोन पोलिसांची २४ फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी असद अहमद आणि साथीदार झाशी येथे उत्तर प्रदेश पोलिसांशी झालेल्या चकमकीत गुरुवारी मारले गेले. मात्र, त्याआधी दीड महिने दोघांना पुणे आणि नाशिकमध्ये काही दिवस राहण्यासाठी गँगस्टर अबू सालेम याच्या साथीदारांनी मदत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून खातरजमा करण्यात येत आहे.
नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला
असद आणि त्याचा साथीदार दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी दोघेही कानपूर, नोएडा आणि दिल्लीत राहिले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी अतिक अहमदने मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलामची गुंड अबू सालेमच्या साथीदारांच्या मदतीने नाशिक आणि पुण्यात वास्तव्याची सोय केली. अतिक याच्याशी जुनी मैत्री असल्याने अबू सालेमने त्याच्या मुलाची आणि साथीदाराची पुण्यात राहण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.