म. टा. प्रतिनिधी, पुणे :भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे घडली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली. टोळक्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शंतनू शिवराज चाटे (वय १९, रा. साई गणेश सोसायटी, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. दिलीप बाबुराव हांगे (रा. साई पार्क सोसायटी, आळंदी) पसार आहे. अमितकुमार विश्वकर्मा (वय २१, रा. लोहगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

लोहगावमधील सार्वजनिक रस्त्यावरून अमितकुमार चालला असताना वडगांव-शिंदे रस्त्यावर चार-पाच जण भांडण करीत होते. अमितकुमार घाबरून पळून जात असताना शंतनू आणि इतरांना त्याने भांडण सोडविल्याचा गैरसमज झाला. त्यामुळे टोळक्याने पाठलाग करून अमितकुमारवर वार करून त्याला गंभीर जखमी केले.

दोस्ताच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कारची बाईकला धडक, दोघा मित्रांसह तिघांचा मृत्यू
तरुणावर वार करणारे लोहगाव परिसरात थांबल्याची माहिती पोलिस अंमलदार स्वप्नील कांबळे आणि विनोद महाजन यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी अमितकुमारने गाडी आडवी केल्याने त्याच्यावर वार केल्याची कबुली दिली. पोलिस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, संजय आढारी, विठ्ठल वाव्हळ, प्रवीण भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लातुरातील ‘तो’ गॅंगवॉर होता?; पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

डोक्यात बाटली फोडून मारहाण

दुकानाच्या पायरीवर बसलेल्या तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडून टोळक्याने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर तरुणाचा १५ हजार रुपयांचा मोबाइल चोरून नेला. बुधवार पेठेतील कॅसेट गल्लीत मध्यरात्री ही घटना घडली. वैभव पाटील (वय २८ रा. बुधवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वैभव मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या पायरीवर बसला होता. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी वैभवला शिवीगाळ केली. टोळक्याने वैभवच्या डोक्यात काचेची बाटली फोडून मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील १५ हजारांचा मोबाइल चोरून नेला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक मनोज अभंग तपास करीत आहेत.

नवी मुंबईत पत्नीचा खून, पापक्षालनासाठी सोलापुरातील बाळूमामाच्या मंदिरात, प्रसाद खाताना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here