कोल्हापूर: कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने आणि राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पुराचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वाचा:

शहरात काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही पावसाचा जोर आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या पाणी ४३ फुटांवरून वाहत आहे. यामुळे प्रयाग चिखली आंबेवाडी येथील लोकांचे स्थलांतर सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे ४० पेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. काही गावात पुराचे पाणी घुसले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखल झाली आहेत. नदीला वाढलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील १०२ बंधारे सध्या पाण्याखाली गेली आहेत.

नरसिंह वाडी येथील दत्त मंदिरात पाणी पोहोचल्याने पहिला दक्षिणद्वार झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या अनेक नद्यांमध्ये वाढत असलेल्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोल्हापूर ते गगनबावडा या रस्त्यावर पाणी आल्यामुळे या मार्गावरून कोकणात जाणारा रस्ता बंद झाला आहे. याशिवाय निपाणी आजरामार्गे गोव्यात जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. केर्ले ते केर्ली या रस्त्यावर पाणी आल्यामुळे रत्नागिरीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. पाणी वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here