मुंबई :सुपर मार्केटमध्ये वाइनची विक्री करण्याच्या महाविकास आघाडीतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात राज्य सरकारकडे ४,७३४ हरकती प्राप्त झाल्या असून, ६,९६८ जणांनी बाजूने मत व्यक्त केले असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. आघाडी सरकारच्या काळात भाजप नेत्यांनीच या निर्णयाला मोठा विरोध केला होता. त्यामुळे आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.राज्यातील सुपर मार्केट किंवा ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइनविक्री करण्याची घोषणा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने केली होती. त्या वेळी या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. या निर्णयाच्या प्रारूप मसुद्यावर नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारकडे लेखी आणि ई-मेलद्वारे तब्बल ११,७०२ हरकती आणि सूचना प्राप्त झाल्याची माहिती हाती आली आहे. यामध्ये ४,७३४ जणांनी निर्णयाला हरकत घेतली आहे; तर उर्वरित ६,९६८ जणांनी बाजूने मत व्यक्त केल्याचे कळते.

नियमांची चौकट

या निर्णयाच्या मसुद्याचे प्रारूप ठरविताना विविध नियमांची आखणी करण्यात आली होती. त्यात प्रामुख्याने सुपर मार्केटमध्ये फक्त सीलबंद वाइनची विक्री करण्याची परवानगी असेल, वाइनव्यतिरिक्त अन्य मद्याची विक्री करता येणार नाही, वाइन विक्रीसाठी सुपर मार्केटमध्ये २.२५ घनमीटर इतके कमाल आकारमानाचे एकल कुलूपबंद कपाट असणे आवश्यक असेल, हे कपाट सुपर मार्केटच्या प्रवेशद्वाराजवळ न ठेवता मागील बाजूच्या कोपऱ्यात ठेवावे, वाइनविक्रीची जाहिरात करू नये, अशी बंधनेही प्रस्तावित करण्यात आली होती.

भंडाऱ्यात त्रिकोणी कुटुंबाला संपवणारे सातजण जन्मभर तुरुंगात, चिमुरड्याच्या जन्मदिनीच न्याय
विरोध कायम?

महाविकास आघाडीच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी विरोधी पक्षात असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला होता. भाजपाचा हा विरोध कायम असल्याने या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत अद्याप ठोस निर्णयाची घोषणा करण्यात आलेली नसल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here