चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ समोर आला, ज्यात हा कर्मचारी दिसत असून तो कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. त्याच्या हातात दिसणाऱ्या मोठ्या चेकवर ३६५ दिवसांची रजा लिहिलेली आहे. अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना रजा (पेड रजा) घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पण ही व्यक्ती इतकी नशीबवान निघाली की त्याला वर्षभराची पगारी रजा मिळाली.
‘लकी ड्रॉ’मध्ये लागली लॉटरी
वृत्तानुसार त्या व्यक्तीने त्याच्या कंपनीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस जिंकले. कंपनीने आयोजित केलेल्या लकी ड्रॉमध्ये बक्षीस आणि शिक्षा दोन्ही होते, त्यामुळे वार्षिक पगारासह सुट्टीचा जॅकपॉट मिळविणे सोपे नव्हते, परंतु नशिबाने कर्मचाऱ्याला साथ दिली. व्हिडिओमध्ये चेन नावाचा हा कर्मचारी अनेकवेळा असे म्हणताना दिसत आहे की बक्षीस खरे आहे का?
अमेरिकाः हॉस्पिटल कर्मचाऱ्याने जिंकली 759 दशलक्ष डॉरलची लॉटरी
कोविड-१९ आजारामुळे लॉकडाऊन दरम्यान तीन वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने डिनरचे आयोजन केले होते आणि याच वेळी कंपनीला लकी ड्रॉ कार्यक्रम व जॅकपॉट बक्षिसे समाविष्ट करण्याची कल्पना सुचली. दरम्यान, आता या लकी ड्रॉ ने खुद्द बॉसला देखील “स्तब्ध” केले. दरम्यान, कंपनीतील एका प्रशासकीय कर्मचाऱ्याने सांगितले की, कंपनी विजेत्याशी चर्चा करेल की तो एनकॅश किंवा त्याच्या सशुल्क रजेचा आनंद घेण्यास प्राधान्य देईल. बक्षिसांमध्ये एक किंवा दोन दिवस अतिरिक्त सशुल्क सुट्टीचा समावेश होता, तर रॅफलमधील पेनल्टीमध्ये वेटर म्हणून काम करण्यासारखी शिक्षा होती.