अहमदनगर: करोनासंबंधी एवढे प्रबोधन सुरू असतानाही अनेकांच्या मानातून त्यासंबंधीची भीती जात नाही. त्यातूनच लक्षणे लपविण्याचे प्रकार होत आहेत. हा प्रकार आता रुग्णांसोबतच डॉक्टरांच्याही जीवावर बेतत आहे. नगरच्या एका खासगी रुग्णालयातील तरुण डॉक्टरचा मृत्यूही अशा प्रकारातून झाल्याचे समोर आले आहे. करोनाची लक्षणे आणि लागण होण्याचा संभव असलेली माहिती रुग्णांकडून लपविली जात असल्याने हा धोका वाढत आहे. ( in )

डॉ. प्रशांत जगताप हे २६ वर्षांचे डॉक्टर येथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करत होते. काल त्यांचा मृत्यू झाला. त्यांना करोनाची लागण झाली होती. लागण होण्यामागील कारण त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, रुग्णांच्या मनातील भीती असल्याचे स्पष्ट होते. रुग्णालयात आलेल्या एका रुग्णाला त्यांनी तापसले होते. प्राथमिक चौकशीत या रुग्णाने बरीच लक्षणे लपवून ठेवली. त्यांनी केलेला प्रवास, इतरांशी आलेले संपर्क ही माहिती विचारूनही ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीप्रमाणे उपचार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या रुग्णाच्या कुटुंबातील दुसरा सदस्य आजारी पडल्याने पुन्हा रुग्णालयात आला. त्याला करोनाची लक्षणे दिसत होती. तपासणी केली तर त्या दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टारांनाही यथावकाश त्याची बाधा झाली. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, त्यांचा उपयोग झाला नाही. शेवटी तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाला. या मृत्यूमुळे नगरचे वैद्यकीय विश्व हळहळले. डॉ. जगताप यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. त्यांची पत्नी गरोदर आहे. अशा परिस्थिती तरुण डॉक्टरचा मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे.

करोनाची भीती लोकांच्या मनात असताना त्यात वैद्यकीय सुविधांच्या गैरसोयीची भर पडत आहे. खाटा रिकाम्या नाहीत, उपचारांसाठी जास्त खर्च येतो. कोव्हिड सेंटरमध्ये हाल होतात. अशा बातम्या पसरत असल्याने लोकांच्या मनातील भीती वाढत आहे. त्यामुळे गंभीर लक्षणे नसलेले रुग्ण माहिती लपवित असल्याचे दिसून येते. लक्षणे किंवा लागण झाल्याच्या शक्यतेबद्दल सांगितले तर आपल्याला चाचणी करून घेण्यास सांगितले जाईल. लागण झाल्याचे आढळून आले तर पुढील हाल सहन करावे लागतील, असे समजून लोक माहिती लपवित असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. ‘ताप नाही, सर्दी नाही, आम्ही कोठेच गेलो नाही, आमच्याकडे कोणी पाहुणे आले नाहीत…’ असे अनेक जण बिनधास्त खोटे सांगताना दिसत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here