मुंबई :आज पहाटे मुंबई – पुणे जुन्या महामार्गातील बोरघाटात शिंगरोबा मंदिराजवळ एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांना आपले प्राणही गमवावे लागले. पुण्याहून मुंबईकडे येत असताना ही दुर्घटना घडली. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या खासगी बस चालकाचं निंयत्रण सुटल्यानं दरीत कोसळली. बसमधून ४० ते ४५ जण प्रवास करत होते. ढोल ताशा पथक पुण्यातील कार्यक्रम संपवून मुंबईकडे निघाले होते. वाटेत झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातून बचावलेल्या शुभम गुढेकर आणि तुषार गावडे हे दिंडोशीतील दोघेजण प्राथमिक उपचारानंतर घरी पोहोचले. यावेळी त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले होते.

शुभम गुढेकर, तुषार गावडे यांचे कुटुंबीय भावूक

खासगी बसचा अपघात झाल्यानंतर जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. तर, इतर प्रवासी जखमी झाले होते. यापैकी शुभम गुढेकर आणि तुषार गावडे हे त्यांच्या दिंडोशीतील घरी टॅक्सीनं पोहोचले. अपघातानंतर उपचार घेऊन मुलं घरी पोहोचताच त्यांची आई भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं.

अवकाळी पावसाचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला; कधीपर्यंत बरसणार? जाणून घ्या हवामानाचा अंदाज…

बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

तुषार गावडे काय म्हणाला?

पिंपरी चिंचवड मधून निघाले त्यावेळी आम्ही चालकाला बस कमी वेगात चालवा, असं सांगितलं होतं. त्यांना ती सूचना देऊन आम्ही झोपलो होतो, असंही तो म्हणाला. अपघातानंतर बेशुद्ध पडल्याचं देखील त्यानं सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळाला भेट

एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी एमजीएम रुग्णालयात जखमींशी संवाद साधला. या पघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत आणि जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

सहा वर्षांचा चिमुकला ते पंचविशीतील तरुण; बोरघाटातील अपघाताने १३ उमदे वादक गमावले

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात

पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ४० ते ४५ जण गंभीररीत्या जखमी झाले तर १३ जणांचा मृत्यू झाला. बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खोल दरीत कोसळून अपघात झाला.

बस १५० फूट खोल दरीत कोसळली, पोलीस कर्मचारी मागचापुढचा विचार न करता पहाटेच्या काळोखात दरीत उतरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here