तत्कालीन ब्रिटीश भारतीय सैन्यात जगतसिंह आणि मानसिंह हे ज्युनिअर कमांडर होते. दोघांना देखील फ्रान्समध्ये सॉमच्या युद्धात वीरमरण आल्याचं मानलं जातं. फिलिप डी लाजलो यांनी काढलेलं हे चित्र दुर्मिळ समजलं जातं. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांच्या सक्रीय सहभागाचा हा पुरावा आहे.
ब्रिटनचे कला आणि सांस्कृतिक वारसा मंत्री लॉर्ड स्टीफन पार्किंसन यांनी हे चित्र आश्चर्यकारक आणि संवेदनशील चित्र असल्याचं म्हटलं. पहिल्या महायुद्धात मदतीसाठी जगभरातून सैन्याला बोलावण्यात आलं होतं. त्या इतिहासाला या चित्राच्या माध्यमातून टिपण्यात आल्याचं पार्किंसन म्हणाले.
पार्किंसन म्हणाले, हे चित्र पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या बहादूर जवानांच्या योगदानाची गोष्ट सांगते. महायुद्धात शौर्य गाजवणारे सैनिक ब्रिटनमध्ये राहिले होते याची साक्ष देणारं हे चित्र आहे. पहिल्या महायुद्धात जवळपास १५ लाख भारतीय सैन्य ब्रिटनकडून लढले होते. भारतीय सैनिकांना फ्रान्समध्ये लढाईसाठी पाठवण्यापूर्वी हे चित्र काढण्यात आलं होतं. लंडनमध्ये फिलिप डी लाजलो यांच्या समोर ते बसले होते. त्यावेळी फिलिप डी लाजलो यांनी ते चित्र रेखाटलं होतं.
चित्रकार फिलिप डी लाजलो यांनी हे चित्र त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी बनवलं होतं, असं मानलं जातं. १९३७ मध्ये फिलिप डी लाजलो यांचं निधन झालं. तो पर्यंत हे चित्र त्यांच्या स्टुडिओमध्ये होतं. एका समितीच्या सल्ल्यानुसार या चित्राच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. हे चित्र पहिल्या महायुद्धातील भारतीय सैनिकांच्या सहभागाचा पुरावा मानला जात आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या