नांदेड :पाणीपुरी खाल्ल्याने एकाच गावातील ५७ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चाभरा गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे. यात लहान मुलांचाही समावेश आहे. विषबाधित रुग्णांना चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.चाभरा गावात पाणीपुरीचा गाडा गेल्या अनेक वर्षांपासून गावात फिरतो. शुक्रवारी १४ एप्रिलला पाणीपुरीचा गाडा गावात आला. यावेळी गावातील लहान मुलांसह अनेक ग्रामस्थांनी पाणीपुरी खाल्ली. त्याचदिवशी रात्री अनेकांची प्रकृती खालवली. सुरुवातीला चाभरा गावातील चार ते पाच जणांना उलटी, पोट दुखणे आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. अचानक हा त्रास सुरू झाल्याने नेमक काय झाले? काहीच समजत नव्हते. काही जणांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असा त्रास इतर लोकांनाही सुरू झाल्याचे थोड्याच वेळात कळले. आणि शनिवारपर्यंत रुग्णांची ही संख्या वाढत गेली.
जवळपास ५७ जणांना विषबाधा झाली असून सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ११ मुले, ४७ महिला आणि पुरुष रुग्णांचा समावेश आहे. पाणीपुरीमध्ये बटाटा दिला जातो. याच बटाट्याच्या भाजीतून ही विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चाभरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४७, अर्धापूर ग्रामीण रुग्णालयात ८, नांदेड येथे खासगी रुग्णालयात दोघांवर उपचार सुरू आहेत.

प्रेमी युगुलाला अडवलं, प्रियकराच्या बरगडीत गोळी झाडली, नांदेडमधील घटनेचं गूढ अखेर उकललं
नांदेडचे पथक दाखल, परिस्थिती नियंत्रणात

जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. रुईकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुरमुरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. संदेश कदम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. निलेश मुस्तापुरे, सतीश जाधव सुपरवायझर कुंटूरवार, आरोग्य सेविका कल्याणी, करकले, टरके, कदम, चिंचोलकर, पंजरकर, आशा वर्कर आणि मदतनीस चाभरा गावात दाखल झाले. या सर्वांनी मिळून बाधित रुग्णांना त्वरित तपासणी करून सलाइन, औषध गोळ्या दिल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असून सर्व प्रकरणावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

वडिलांसमोरील अडचणी वाढत होत्या, संकट कमी होण्याऐवजी वाढत होतं,अखेर लेकानं उचललं टोकाचं पाऊल
रुग्णांची प्रकृती स्थिर…

काही अत्यावस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय नांदेड येथे पाठविण्यात आले आहे. तर येथे दाखल रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, असे सरपंच प्रतिनिधी सदाशिवराव चाभरकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here