अतिक अहमद आणि अशरफ अहमद याला वैद्यकीय तपासणीसाठी प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयात नेण्यात आले होते. गुड्डू मुस्लीम यांच्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात येत होते. गुड्डू मुस्लीम यांच्या अतिक आणि अशरफ उत्तर देत होते. अतिक आणि अशरफ माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते, त्याचवेळी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.
यूपी पोलीस अतिक अहमद आणि अशरफ अहमद याची चौकशी करत होते. उमेश पाल खून प्रकरणात दोघांची चौकशी सुरू होती. अतिक अहमद याला साबरमती कारागृहातून आणण्यात आले होते. तर, त्याचा भाऊ अशरफ याला बरेली तुरुंगातून आणण्यात आले.
प्रयागराज येथील घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. पोलीस अधिकारी प्रशांत कुमार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. योगी यांनी डीजीपी यांना बोलावलं आहे.
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची रात्री 10.35 वाजता गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनास्थळावरून तीन हल्लेखोरांना अटक केल्याचे वृत्त आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी या घटनेवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. यूपीमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली असून गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात खुलेआम गोळीबार करून कुणाचा बळी जाऊ शकतो, मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय?, असा सवाल अखिलेश यादव यांनी केला. या घटनेमुळं जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, काही लोक जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे, असं अखिलेश यादव म्हणाले.