म. टा. प्रतिनिधी, : पतीने पत्नी आणि मुलांना १०० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवण्याची दिल्याप्रकरणी पतीसह घरातील सहा जणांविरोधात हडपसर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

फुरसुंगी येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती सिध्दार्थन व्ही. पी (वय ४२, रा. तंजावरू, तमिळनाडू), पनीर माथोर, वडीवग्गाल व्ही. पी.(वय ६३) आणि इतर तिघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिलेचा सिध्दार्थनबरोबर २०१०मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर माहेरहून पैसे आणण्यासाठी तक्रारदारांचा वारंवार छळ करण्यात येत होता. पतीबरोबर सासरची मंडळीही त्यांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होते. दरम्यान, आरोपीने तक्रारदार महिलेला आणि तिच्या मुलांना ठार मारून तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्याची धमकी दिली.

तरुणावर प्राणघातक हल्ला; तिघांना अटक
चार दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर पालघन, तलवारीने डोक्यात, हातावर, मानेवर, नाकावर वार केले. त्यानंतर सिमेंट ब्लॉक व फरशीच्या साह्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बोपोडी परिसरात हा प्रकार घडला. निखिल ताराचंद गायकवाड (वय २३, रा. बोपोडी) असे वार झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. पप्पू उर्फ जयराज रंजन पिल्ले, राकेश वेगडे (धायरी), योगेश चव्हाण (बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील पिल्ले रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बोपोडी येथील जुन्या सोनार पडीक बिल्डिंगजवळ हा प्रकार घडला. याबाबत मारहाण झालेल्या तरुणाचा लहान भाऊ स्वप्नील गायकवाड (वय २३) याने तक्रार दिली आहे.

तक्रारदार आणि वार झालेला तरुण सख्खे जुळे भाऊ आहेत. गेल्या पाच दिवसांपूर्वी निखिलची आरोपी पिल्ले, वेगडे व चव्हाण या तिघांसह भांडणे झाली होती. त्यातूनच आरोपींनी त्यांच्या इतर दोन साथीदारांच्या साथीने निखिलवर हत्यारांनी वार केले. त्यानंतर सिमेंट ब्लॉक व फरशीने मारहाण करून गंभीर जखमी केले. जखमी निखिलवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विनायक कोळी करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here