म. टा. प्रतिनिधी,

खाटा उपलब्ध नसल्याचे सांगून रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर नजर ठेवण्यासाठी सांगलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी ॲपचा वापर सुरू केला आहे. बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲपद्वारे रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची माहिती एका क्लिकद्वारे नागरिकांनाही मिळू शकते. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयासह बॉम्बे नर्सिंग ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांसाठी अॅप कार्यान्वित केले आहे. यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा बसणार आहे.

करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सांगली जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील २५ खासगी रुग्णालये कोव्हिड उपचारासाठी अधिग्रहित केली आहेत. करोनाबाधित रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी संबंधित खाजगी रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जाते. दाखल असलेल्या रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. रुग्णालयांकडून उपचारात टाळाटाळ होत असल्याने रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत. यामुळे करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन खासगी रुग्णालयांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम अॅप विकसित केले आहे. .nic.in या जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड १९ विभागात बेड इन्फॉर्मेशन सिस्टीमवर, तसेच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या smkc.gov.in/covid19 या संकेतस्थळावर नागकिकांना खाटांची माहिती मिळते.

बेड इन्फॉर्मेशन सिस्टीम ॲपमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण व संशयित रुग्ण असे वर्गीकरण केले आहे. या दोन्ही विभागांसाठी रुग्णालयांना खाटांची मर्यादा निश्चित करून दिली आहे. रुग्ण दाखल होताच त्याची माहिती रुग्णालयांनी ॲपमध्ये भरावी, अशा सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांनी खोटी माहिती भरून दिशाभूल करू नये यासाठी, आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालयांची तपासणी केली जाते. या यंत्रणेमुळे नागरिकांना कोणत्या रुग्णालयात किती फाटा शिल्लक आहेत याची माहिती मिळते. यामुळे रुग्णालयांना खाटा शिल्लक असताना रुग्णाला टाळता येत नाही. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या ॲपला जोडला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयांचा माहिती जिल्हा प्रशासन आणि नागरिकांनाही एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे.

गॅस शवदाहिनी सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत ११३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दगावलेल्या रुग्णांचे दहन किंवा दफन आरोग्य विभागाकडूनच केले जाते. गेल्या पंधरा दिवसात करोना बळींची संख्या वाढत आहे. रोज सरासरी सहा ते आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. सध्या महापालिकेच्या पंढरपूर रोड येथील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यविधी केले जातात. मात्र, कर्मचारी संख्या अपुरी असल्याने या कामाचा ताण वाढला आहे. यामुळेच महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी बंद असलेली गॅस शवदाहिनी पुन्हा सुरू केली. शनिवारपासून गॅस शवदाहिनीचा वापर सुरू होणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here