लखनऊ: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यात प्रचंड दहशत असलेला कुख्यात गुंड झाली आहे. त्याचा भाऊ अशरफची त्याचवेळी हत्या करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा असद पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला. २४ फेब्रुवारीला उमेश पाल आणि त्याच्या दोन सुरक्षारक्षकांची धूमनगंजमध्ये हत्या झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अतिकचा मुलगा असद, गुड्डू मुस्लिम, गुलाम, साबिर, अरबाज आणि विजय उर्फ उस्मान चौधरी दिसले. त्यानंतर पोलिसांनी अतिकच्या गँगविरोधात पावलं उचलण्यास सुरुवात केली. अतिकनं ४४ वर्षांमध्ये उभारलेलं साम्राज्य गेल्या ५१ दिवसांमध्ये पोलिसांनी संपवलं आहे. आणि त्याचा भाऊ अशरफ अहमदला प्रयागराजमधील वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात येत असतानाच त्यांच्या गोळीबार झाला. हल्लेखोरांनी अवघ्या काही फुटांवरून दोघांवर गोळ्या झाडल्या. अतिकच्या डोक्याला गोळी लागली. हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्यांनी लगेचच आत्मसमर्पण केलं. उमेश पाल खून प्रकरणात हे दोघे मुख्य आरोपी होते. अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्या एका ट्विटची चर्चा आहे.तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी २८ मार्चला एक ट्विट केलं होतं. त्यात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं होतं. ‘अशा हाय प्रोफाईल अपराध्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यासोबत माध्यमांना परवानगी नसावी. उद्या एखादा गँगस्टर, माध्यम प्रतिनिधी बनून त्या अपराध्याला गोळी झाडू शकतो,’ असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. उमेश पाल हत्या प्रकरणात अतिक अहमदला प्रयागराज न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यासाठी त्याला गुजरातच्या साबरमती तुरुंगातून प्रयागराजला नेण्यात आलं होतं. त्यावेळी माध्यम प्रतिनिधींची वाहनं पोलिसांच्या ताफ्यासोबत प्रवास करत वार्तांकन करत होती. ती परिस्थिती पाहून बग्गा यांनी ट्विट केलं होतं. बग्गा यांनी वर्तवलेली शक्यता अगदी तंतोतंत खरी ठरली.काल (१५ एप्रिल) रात्री दहा वाजताच्या सुमारास अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ या दोघांना पोलिसांनी प्रयागराजमधील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं. यावेळी माध्यमांचे प्रतिनिधी दोघांना प्रश्न विचारत होते. अशरफ उत्तर देत होता. ‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ असं अशरफ म्हणत असताना तिघांनी गोळीबार सुरू केला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे तिघे माध्यमांचे प्रतिनिधी म्हमून तिथे आले होते. त्यांच्याकडे बूम आणि कॅमेरा होता. तिघांना अटक करण्यात आली आहे. गोळीबार केल्यावर दोघे भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यावेळी आरोपींनी आत्मसमर्पण केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here