प्रयागराजःउत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी प्रयागराज येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हातात बेड्या असताना प्रसारमाध्यमांशी बोलणाऱ्या या दोघांची तीन हल्लेखोरांनी हत्या केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्याची ओळख पटली आहे. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी आरोपींची नावे आहेत. अतीक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तिघांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या त्यानंतर स्वतःच पोलिसांसमोर सरेंडर केलं.अतीक अहमदवर हल्ला करण्यासाठी तिघे हल्लेखोर पत्रकार म्हणून घटनास्थळी आले. अतीक प्रसारमाध्यमांसमोर येताच तिघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या गराड्यातील दोघांनी अतिशय जवळून अतिक व अशरफवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात दोघेही रक्तबंबाळ होत जमिनीवर कोसळले व काही वेळातच त्यांनी प्राण सोडले. या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

मी तर आधीच म्हटलं होतं! अतिकच्या हत्येनंतर भाजप नेत्याचं १८ दिवसांपूर्वीचं ट्विट चर्चेत
अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर आरोपींनी पोलिसांना जबाब दिला आहे. अतीक अहमदचं पाकिस्तानसोबत लागेबंधे होते. त्याने व त्याच्या टोळीने अनेक निरापराधांचा जीव घेतला. अतीक जमीन बळकवण्यासाठी हत्या घडवून आणायचा तर त्याच्या विरोधात जबाब देणाऱ्यांनाही त्रास द्यायचा. त्याचा भाऊ अशरफदेखील असंच करायचा. म्हणूनच आम्ही दोघांची हत्या केली, असं आरोपींनी म्हटलं आहे.

अतिक,अशरफ मीडियाला उत्तरं देत होते, मारेकऱ्यानं बंदूक डोक्याजवळ नेत गोळ्या झाडल्या, हत्येचा थरार कॅमेऱ्यात कैद
सूत्रांनुसार, तिन्ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे आहेत. लवलेश तिवारी बांदा, सनी हमीरपूर आणि अरुण मौर्य कासगंज येथील मुळ रहिवाशी आहेक. अतिकचे पाकिस्तानच्या एयएसआयशी व लश्कर ऐ तौयबासोबत संबंध होते, असा दावा आरोपींनी केला आहे. दरम्यान, अतिक अहमद हत्याकांडातील तिन्हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं त्यांची आपापसात ओळख कशी झाली याचा तपास पोलिस करत आहेत. तिघांचे वय २० ते २५ वर्षांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, अतिक अहमदवर हल्ला केल्यानंतर तिघांपैकी कोणीच पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तिघांनी ज. श्री रामच्या घोषणा दिल्या आणि पोलिसांसमोर फिल्मी स्टाइलने सरेंडर केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here