नवी दिल्ली:लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात शनिवारी झालेल्या सामन्यात पंजाबने २ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. किंग्जसाठी या सामन्यात सिकंदर रझाने महत्त्वाची भूमिका बजावली. गोलंदाजीनंतर त्याने आपल्या फलंदाजीनेही धुमाकूळ घातला आणि पंजाबला सामना जिंकून दिला. मात्र, सिकंदरशिवाय लखनऊच्या एका खेळाडूने आपल्या चमकदार कामगिरीने नाव कमावले आहे. विशेष म्हणजे त्याचा हा पहिलाच आयपीएल सामना होता. पदार्पणाच्या सामन्यातच चमकदार कामगिरी करणारा या युवा खेळाडू नेमका कोण ते पाहूया.कोण आहे युद्धवीर सिंह

युवा वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंग चरकने आपल्या पहिल्याच सामन्यात आपल्या खेळीने सर्वांना भुरळ पाडली. जम्मूचा असलेल्या या युवा वेगवान गोलंदाजला युद्धवीर सिंग चरक याला लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जविरुद्ध पदार्पण करण्याची संधी दिली. अशा परिस्थितीत युद्धवीरने पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच षटकात दाखवून दिले की फ्रँचायझीने त्याच्यावर विश्वास दाखवून योग्य निर्णय घेतला आहे. युद्धवीरने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंजाब किंग्जचा सलामीवीर अथर्व तायडेला क्लीन बोल्ड केले.

पचास तोला… वास्तव मधील संजय दत्तच्या लूकमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन, पाहा व्हिडिओ
याशिवाय, संपूर्ण पराभवाबद्दल बोलायचं तर युद्धवीरने सामन्यात त्याच्या ३ षटकांच्या स्पेलमध्ये ६.३३ च्या उत्कृष्ट इकॉनॉमीने गोलंदाजी करत केवळ १९ धावा देऊन २ विकेट घेतले. हा सामना त्याच्यासाठी स्वप्नवत पदार्पणाचा ठरला.

१३ सप्टेंबर १९९७ रोजी जन्मलेल्या युद्धवीर सिंग चरकने २०१९-२० मध्ये हैदराबादसाठी देशांतर्गत पदार्पण केले. विशेष म्हणजे यानंतर तो जम्मू-काश्मीरकडून खेळू लागला. ण युद्धवीरच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोललो, तर त्याने ४ प्रथम श्रेणी, ८ लिस्ट ए आणि १५ टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे ३, ८ आणि ६ विकेट्स घेतल्या आहेत.

अंबानींनी अख्खी पर्स रिकामी केली, पोलार्डची कसर भरुन काढली आणि चेन्नईलाही जशास तसं उत्तर दिलं

मुंबईच्या संघातून लखनौमध्ये

युद्धवीर हा नेट बॉलर म्हणून २०२० पासून आयपीएलचा भाग आहे. २०२० मध्ये तो मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर होता. त्याच वेळी, पुढील वर्षी (IPL 2021) लिलावात, त्याला मुंबईने ५० लाख रुपयांना विकत घेतले. त्याला मुंबई इंडियन्ससाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नसली तरी २०२२ च्या मेगा लिलावात ५ वेळा आयपीएल चॅम्पियन संघाने त्याला रिलीज केले. आता २०२३ च्या आयपीएल लिलावात एलएसजीने या खेळाडूला २० लाख रुपयांना खरेदी केले. पाहिलं तर चरकच्या आयपीएल पगारात ३० लाखांची तफावत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here