वाशिम: पोलीस किंव्हा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो मुलं तयारी करतात.अत्यंत कठीण परिश्रम करूनही त्यात मोजकेच यशस्वी होतात. मात्र वाशिमच्या मानोरा तालुक्यातील ‘गुंडी’ गावच्या तीन भावंडांनी लागोपाठ यश मिळवत मोलमजुरी करणाऱ्या बापाचे पांग फेडले आहेत.गुंडी गावचे सुभाष गजभार यांना तीन मुलं एक मुलगी आणि दोन मुले. मोल मजुरी करून सुभाष यांनी मुलांना शिक्षण दिलं आणि मुलांनी सरकारी नोकरी करावी अशी त्यांची मनातून इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न त्यांच्या मुलीने पहिल्यांदा पूर्ण केले. मुलगी अलका गजभार हिने खाकी वर्दी घालून सेवा देण्याचा निर्धार केला. मात्र अत्यंत मागास भाग असलेल्या मानोऱ्याच्या गावखेड्यातून मुलीने पोलिस भरतीची तयारी करणे तितकं सोप्प नव्हतं. त्यातच तयारी करत असतांना २०१६ साली तिचं लग्न झालं पण अलकाने ध्येय सोडलं नाही.

अतीक अहमदवर गोळी झाडणारे ते हल्लेखोर कोण होते?; पोलिस तपासात समोर आलं धक्कादायक सत्य
अलकाला पतीची साथ लाभली अन् ती वाशिम पोलीस दलात भरती झाली. ती गुंडी गावची पहिली महिला पोलीस होती. नंतर बहिणीची प्रेरणा घेवून आकाश सुभाष गजभार यानेही मागील वर्षी पोलीस दलात दाखल होत यश मिळवलं. विशेष म्हणजे आकाशचेही भर्तीपूर्वी २०२० मध्ये लग्न झाले होते. त्यापाठोपाठ आता सुभाष यांचा धाकटा मुलगा नितीन गजभर याची देखील नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात अकोला पोलीस दलात निवड झाली आहे.

एन्काउंटर होईल किंवा…; १९ वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती मृत्यूची भविष्यवाणी
अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत कठीण परिश्रम करत गजभार भावंडांनी वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. पोलीस दलात दाखल झालो असलो तरी वरिष्ठ पदावर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवणार असल्याचे नितीन यांनी महाराष्ट्र टाईम्ससोबत बोलतांना सांगितले. तर वडील सुभाष गजभार यांनी सांगितले की मोठे कष्ट करून मुलं पोलीस झाले त्याचा बाप म्हणून मला सार्थ अभिमान आहे.

मोठा दिलासा! मे महिन्यात करोना रुग्णांची संख्या घटणार, तज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

बापाचं काळीज; लेकाची हौस पूर्ण करण्यासाठी भंगारातून बनवली शानदार ई-बाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here