नवी दिल्ली:विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यातील संबंध फारसे बरे नाही, असे सर्वांच्या ऐकिवात आहे आणि यावर बराचश्या चर्चादेखील रंगतात. जेव्हा कोहलीने टी-२० मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनच या दोघांमध्ये बिनसले आहे. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. दोघांनीही एकमेकांबद्दल वादग्रस्त विधाने केली होती. मात्र, काही काळापूर्वी कोहली आणि गांगुलीच्या बिघडलेल्या नात्याची चर्चा दडपण्यात आली होती. पण आता आयपीएल २०२३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा या चर्चांनी वर डोकं काढलं आहे, कारण प्रसंग तसेच पाहायला मिळाले.सौरव गांगुली हे दिल्ली कॅपिटल्स संघाचे क्रिकेट संचालक आहेत. तर कोहली २००८ पासून बंगळुरूकडून आयपीएल खेळत आहे. अशा स्थितीत दोन्ही संघ समोरासमोर आल्यावर दोघांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विशेषतः विराट कोहली अतिशय आक्रमक मूडमध्ये दिसला. सामन्यादरम्यान त्याने सौरवकडे जबरदस्त नजर टाकली, ज्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.

मुंबई इंडियन्सचे खेळाडू कोलकाताविरुद्धच्या सामन्यासाठी महिला संघाची जर्सी घालणार, काय आहे कारण
लाइव्ह मॅचमध्ये सौरव गांगुलीकडे नजर रोखून पाहत होता विराट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्ससमोर निर्धारित २० षटकांत १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या दिल्ली कॅपिटल्सचा डाव २३ धावांनी हुकला. त्याचवेळी दिल्लीच्या डावात विराटची आक्रमकताही सातव्या आसमानावर होती. खासकरून मोहम्मद सिराज दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील १८वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्ट्राइकवर असलेला अमन खान मोठा शॉट खेळताना झेलबाद झाला.

कोण आहे युद्धवीर सिंह? MI चा नेट बॉलर LSG कडून पदार्पणाच्या सामन्यातच चमकला
अमन खानचा हा झेल इतर कोणी नसून विराट कोहलीने टिपला. किंग कोहली कॅच घेतल्यानंतर सीमारेषेच्या दिशेने परत जात होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या डगआउटमध्ये बसलेल्या सौरव गांगुलीकडे नजर रोखून पाहिलं. कोहलीच्या या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. बंगळुरू आणि दिल्ली यांच्यातील सामना पाहून असे वाटले की सौरव आणि कोहली यांच्यात अजूनही टक्कर तशीच आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

इतकेच नव्हे तर सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांना हात मिळवायचा असतो, ही एक पद्धत आहे. पण यादरम्यान सुद्धा दोघांमधील खुन्नस समोर आली. कोहली आणि गांगुली आपापल्या संघातून हात मिळवण्यासाठी समोरासमोर येत होतेच की तितक्यात गांगुली दिल्लीच्या संघातील रेषेतून बाहेर अली आणि त्यांनी विराटला हात मिळवला नाही. यामुळे या दोघांमधील मतभेद अजूनही कायम आहेत, हे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here