मुंबई: दिंडोशीतील खडकपाडा, संतोषनगर, नागरी निवारा, महापालिका वसाहतीतील नागरिकांसाठी शनिवारची सकाळ भीषण असा आघात घेऊन आली. पिंपरी-चिंचवड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वादनासाठी गेलेल्या परिसरातील बाजीप्रभू ढोलताशा पथकाच्या जवळपास ४० जणांच्या चमूला बस अपघात झाला. ४० पैकी १३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले, मृतांची नावेदेखील कळली. त्यानंतर खडकपाडा, संतोषनगर, महापालिका वसाहतीत भीषण अशी शोककळा पसरली.

‘आमचा साई हा गोडच. पण तो बिचारा गेला. पुन्हा कधीच येणार नाही’ अशा शब्दात कृतिक लोहितच्या शेजारच्यांनी भावना व्यक्त केल्या. जेमतेम १६ वर्षांच्या कृतिकचे कुटुंब संतोषनगर, दिंडोशीच्या महापालिका वसाहतीत राहणारे आहे. कृतिक ढोल-ताशा पथकात सुदंर वादन करायचा. स्वभावाने हळवा, तितकाच गोड म्हणूनच आम्ही त्याला प्रेमाने साई म्हणायचो. पण आता तो पुन्हा दिसणार नाही’, असे सांगताना शेजारच्यांच्या डोळ्यात पाणी आले. कृतिकला वडील नाहीत. आई घरकाम करते. तर मोठी बहिण पार्टटाइम नोकरी करत शिक्षण घेते. जेमतेम १६ वर्षाचा सर्वांचा लाडका कृतिक आता त्यांच्यात नाही, असं म्हणत शेजारच्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.

भरदिवसा भाजप कामगार आघाडीच्या शहराध्यक्षावर गोळीबार, नाशकात खळबळ
हरहुन्नरी वीर मांडवकर फक्त १२ वर्षांचा होता. १२व्या वर्षी काही सेकंदाच्या अपघाताने त्याला जगाचा निरोप घ्यायला लावला. तो एकुलता एक होता. बहीण भाऊ कोणीच नाही. खडकपाडा परिसरातीलच महापालिका वसाहतीत राहणारा वीर कमलेश मांडवकर हा जेमतेम आठवीत शिकणारा होता. परंतु वादनाची त्याला प्रचंड हौस होती. तो बाजीप्रभू ढोल ताशा पथकात रुजू झाला. उंचीने लहान, वयानेपण लहान, तसे असतानादेखील अल्पावधीतच तो अप्रतिम असे ढोल वादन शिकला.

या अपघातात १२ वर्षांच्या वीरचा जागेवरच दूर्दैवी मृत्यू झाला. वास्तवात वीरचे वडील गावी असतात. तो आईसह मामा-मामी व आजी-आजोबांकडे राहत होता. अपघाताची माहिती मिळताच आई तातडीने मामासह निघाली. वडिलांना उशिरा माहिती मिळाली. पण तेदेखील कोकणातून थेट तिकडे निघाले. त्याचे पार्थिव घेऊन येण्याची वेळ दुर्दैवी मांडवकर कुटुंबीयांवर आली.

राहुल गोठल यंदा बारावीत गेला होता. घरी गतीमंद असलेली थोरली बहिण आणि आई-वडीलांना मागे सोडून कायमचा निघून गेला. त्याच्या रुपात आई-वडिलांनी बघितलेले स्वप्न क्षणार्धात धुळीला मिळाले. दिंडोशीतीलच खडकपाडा परिसरातील शिवनेरी बैठी चाळ सोसायटीत राहुल गोठणचे कुटुंबिय राहते. वडीलांच्या हाती काम नसल्याने आई घरकाम करणारी. थोरल्या बहिणीची अवस्थादेखील बिकट, या स्थितीत जेमतेम एका खोलीच्या घरात राहून राहुलने अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावी करुन घर चालविण्यासाठी हातभार लावण्याचा त्याचा निर्धार होता. याचदरम्यान त्याने ढोल-ताशा पथकात वादन सुरू केले. ताशा वाजविण्यात तो कुशल होता. मात्र खोपोलीजवळील दूर्दैवी अपघाताने राहुल गोठलच्या कुटुंबीयांना जबर झटका दिला.

एन्काउंटर होईल किंवा…; १९ वर्षांपूर्वीच अतिक अहमदने केली होती मृत्यूची भविष्यवाणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here